जामखेड सौताडा रोडवर चालत्या चारचाकी वाहनाने घेतला पेट, गाडी जळुन खाक
जामखेड प्रतिनिधी
बीड वरुन जामखेड मार्गे नगरकडे जाणार्या चालत्या चारचाकी वहाणाने जामखेड सौताडा रोडवरील मोहा शिवारात अचानक पेट घेतला. घटनास्थळी पोलिसांच्या मदतीने नगरपरिषदेच्या अग्नीशमन गाडीने आग विझवण्यात आली मात्र तोपर्यंत सर्व गाडी जळुन खाक झाली होती.
याबाबत पोलीसांन कडुन मिळालेली माहिती अशी की शनिवार दि 7 डिसेंबर रोजी वहानचालक जयदीप संपतराव सुरवसे रा. बीड. गाडी क्रमांक एम. एच 46 एक्स 2268 या चारचाकी वहानातुन आपल्या कामानिमित्त बीड वरुन नगरकडे रत्नागिरी या ठिकाणी चालले होते. यावेळी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी जामखेड सौताडा रोडवरील मोहा शिवारातुन चालली होती.
यावेळी समोरुन येणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकास या गाडीच्या बोनेटच्या बाजुने जाळ निघत आल्याचे लक्षात आले. त्याने ही माहिती आत बसलेल्या चालक जयदीप सुरवसे यांच्या लक्षात आणून दिली. यानंतर सुरवसे हे तातडीने गाडीतुन खाली उतरले त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गाडीतील डीझेल मुळे या गाडीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. ही घटना जामखेड पोलीस स्टेशनला समजताच पो. कॉ. प्रविण इंगळे पळसे देवा, ज्ञानेश्वर बेलेकर पो. ना. सरोदे, मांडगे, घोळवे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने नगरपरिषदेच्या अग्नीशमन गाडीने आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत पुर्ण गाडी जळुन खाक झाली. यानंतर जामखेड सौताडा रोडवर मोठ्या प्रमाणात ट्रॉफीक जाम झाले होते. घटनास्थळी मोहा येथिल माजी सरपंच शिवाजी डोंगरे व ग्रामस्थांनी पोलिसांना हवातुक सुरळीत करण्यास मदत केली.
चौकट
गाडी चालक जयदीप सुरवसे यांनी सदरची गाडी तीन महिन्यांपूर्वीच विकत घेतली होती. 2013 सालची ही गाडी आहे. ते आपल्या कामा निमित्त एकटेच रत्नागिरी या ठिकाणी चालले होते. सदरची आग गाडीतील वायरींगच्या शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र समोरुन येणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने ही घटना निदर्शनास आणून दिल्याने याचालकाचे प्राण वाचले व सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.
error: Content is protected !!