Home राजकारण हुकुमशाही व गुंडाराज थांबवायचा आसेल तर येणार्या २३ तारखेला भाजपला मुठमाती द्या...
हुकुमशाही व गुंडाराज थांबवायचा आसेल तर येणार्या २३ तारखेला भाजपला मुठमाती द्या – आ. रोहित पवार
जामखेड प्रतिनिधी
राम शिंदे हे मुकादम आहेत, गुंडाच्या माध्यमातून सामान्य लोकांना दम देतात, माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्हॉटसपला स्टेटस ठेवले तर काही भाजप लोक फोन करुन दम देतात, ही हुकुमशाही व गुंडाराज थांबवायचा आसेल तर येणार्या २३ तारखेला भाजपला मुठमाती द्या आशी घणाघाती टीका आ. रोहित पवार यांनी केली आहे.
महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आमदार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ मंगळवार दि १२ नोव्हेंबर रोजी दुपारी जामखेड येथे आयोजित करण्यात आलेल्या मताधिक्य मेळाव्यास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी आ. रोहित पवार यांनी आ. राम शिंदेवर तोफ डागली. पुढे बोलताना आ. रोहित पवार म्हणाले की गेल्या पंचवार्षिक निवडणुकी पेक्षा यावर्षी मोठे लीड द्यायचा आहे. माझे विरोधक राम शिंदे काय म्हणतात की ही भुमीपुत्राची लढाई आहे. पण मला त्यांना सांगायचे आहे की २०१९ लाच जनतेने भुमीपुत्र ठरवला आहे. तुम्ही कोरोना काळात गार्डन मध्ये पाणी मारत होतात व आम्ही रुग्णांची सेवा करत होतो. त्यामुळे तुम्हाला लोकांची सेवा करायचे सुचले नाही. तुमची सत्ता असताना तुम्ही मतदारसंघात टंचाई काळात काय करत होतात. जिथं सरकार कमी पडलं तीथं आम्ही सरकार बनुन लोकांची सेवा केली.
लंपीचा रोग आला त्यावेळी राम शिंदे गायप झाले, आम्ही सरकार कडुन एक लाख लसी आणुन जणावरांना दिल्या. आ. रोहित पवार यांची ओळख फक्त कर्जत जामखेडच्या जनतेमुळेच आहे. राम शिंदे हे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अर्थकारण माझ्याकडे पाहीजे म्हणून दहा दिवस रुसुन बसले, या विधानसभेला मला निवडणुकीसाठी मला पैसै द्या असे म्हणतात पण साडेसात कोटींची संपत्ती व बारा खाती आसताना देखील लोकांना पैसै मागतात. सरकार देखील महाविकास आघाडीचे येणार आहे त्यामुळे कर्जत जामखेड तालुक्यात शेतीसाठी कुकडीचे पाणी व एमआयडीसीचा प्रश्न सोडवणार आहोत.
देवेंद्र फडवणीसांनी राम शिंदे यांना सांगितले की रोहीत पवार यांना मतदान संघात आडवुन ठेवा मात्र हा प्रयत्न त्यांचा फसला आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर महालक्ष्मी योजना बंद होणार नाही, महीलांना तीन हजार रुपये महीन्याला देणार आहेत. राम शिंदे साहेब २३ नंतर शेवटी येडशीलाच जावं लागणार आसा टोला देखिल रोहित पवार यांनी राम शिंदेंना लावला. कुटुंब फोडलं पण सर्व पदाधिकारी आमच्या सोबत राहिले त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो आसे देखील रोहित पवार म्हणाले.
यानंतर माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत म्हणाले की ओबीसी बांधवांनो विषारी भुलथापांना बळी पडु नका? सोडुन गेलेले नेते नाहीत ते अभिनेते आहेत. आ. रोहित पवार यांच्याकडे सर्व सामान्य जनता आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन रोहित पवार काम करतात राम शिंदे हे भुमीपुत्र नाहीत आ. रोहित पवार हेच खरे भुमीपुत्र आहेत.
दत्तात्रय वारे म्हणाले की येणाऱ्या २३ तारखेला मतमोजणीच्या दिवशी पाला पाचोळ्या सारखे राम शिंदे उडुन जाणार आहेत. महाराष्ट्रातील खोके सरकार उलटावुन टाकायचे आहे. आ. रोहित पवार पवार यांच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचा गोरगरिबांना फायदा होणार आहे. गुंडागर्दी व दहशत संपवण्याचे काम फक्त आ. रोहित पवार हेच करणार आहेत.
जिल्हा बँकेचे संचालक आमोल राळेभात म्हणाले की पवार कुटुंबाच्या सोबत सर्व राळेभात कुटुंब खंबीरपणे उभे आहे. चांगले अधिकारी पाहिजेत यासाठी आ. रोहित पवार यांना निवडुन देणे गरजेचे आहे. दहशत व गुंडागर्दी संपवायची आसेल तर रोहित पवार यांना निवडुन द्या.
कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, सुर्यकांत मोरे, राजेंद्र कोठारी, अर्चनाताई संपत राळेभात, पांडुरंग माने, सह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी तालुक्यातील विविध गावातील लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला.
error: Content is protected !!