आमदार प्रा.राम शिंदे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा – सुनिल साळवे
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थिती कर्जत येथे भव्य मेळाव्याचे आयोजन
जामखेड : भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रा राम शिंदे यांच्या प्रचारार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा १२ नोव्हेंबर रोजी शिवपार्वती मंगल कार्यालय कर्जत येथे पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या मेळाव्यासाठी कर्जत-जामखेड मतदारसंघातील आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे अवाहन आरपीआयचे (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी केले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. ते भाजपा – महायुतीचे कर्जत जामखेड मतदारसंघातील उमेदवार आमदार प्रा राम शिंदे यांच्या प्रचारासाठी कर्जतला येणार आहेत. त्यांच्या समवेत आरपीआयचे राज्य उपाध्यक्ष संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव व राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे हे उपस्थित राहणार आहेत. या सभेच्या जय्यत तयारीसाठी पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार कंबर कसली आहे. सभा यशस्वी होण्यासाठी महायुतीने जोरदार तयारी हाती घेतली आहे.
आरपीआयची संपूर्ण ताकद महायुतीचे उमेदवार आमदार राम शिंदे यांच्या पाठीशी उभी करण्याचा निर्धार मतदारसंघातील आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.भूमिपुत्र आमदार प्रा. राम शिंदे यांना कर्जत जामखेड मतदारसंघातून रिपब्लिकन पक्ष विजयाचे निर्णायक लीड देणार असल्याचा निर्धार ०९ रोजी जामखेड येथे पार पडलेल्या आरपीआयच्या बैठकीत घेण्यात आला.
केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत येथे १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या सभेसाठी जामखेड तालुक्यातून १५० गाड्या तर कर्जत तालुक्यातून २०० गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी मतदारसंघातील आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे अवाहन आरपीआयचे (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी केले आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कर्जत येथे १२ रोजी होणारा दौरा यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, आरपीआयचे नेते अंकुश भैलुमे, संजय भैलुमे, सतिश भैलुमे, दत्ता कदम, विशाल काकडे, जामखेड तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, शिवाजी साळवे, सतिश साळवे, देवा साळवे या नेत्यांसह गावागावातील कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. यामुळे महायुतीच्या गोटात उत्साह संचारला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची कर्जत येथे होणारी सभा महायुतीचे उमेदवार आमदार राम शिंदे यांच्या विजयासाठी निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here