{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1,"adjust":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
जवळा गणात आमदार रोहित पवार यांची राम शिंदेंना धोबीपछाड
दशरथ कोल्हे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश!
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील जवळा गणात आमदार रोहित पवार यांनी राम शिंदेंना धोपीपछाड देत जोरदार धक्का दिला आहे. चेअरमन दशरथ कोल्हे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तुतारी हाती घेतली. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली असून हा आमदार राम शिंदे यांना मोठा हादरा दिल्याचे बोलले जात आहे.
यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ अधिकच वाढले असून आमदार रोहित पवार यांचे मतदारसंघात सुरू असलेली विकासकामे,शिक्षण, आरोग्य आणि नागरी सुविधा या क्षेत्रात केलेली कामे यामुळे सर्वसामान्य जनता त्यांच्या कामावर समाधानी असून आता भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते हे देखील त्यांच्या कामाने प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत आहेत. आमदार राम शिंदे हे मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामात खोडा घालत असून हे आता भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनाही समजले आहे. भविष्यात जसजशी निवडणूक जवळ येईल अजून मोठे पक्षप्रवेश होणार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आमदार रोहित पवार यांच्याकडे मतदारसंघाच्या विकासासाठी व्हिजन असून त्यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांनी प्रेरित होऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत असल्याचं मत या सर्व पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
आमदार रोहित पवार यांनी दशरथ कोल्हे आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांचं स्वागत करत त्यांना पुढील यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भविष्यात यासर्व कार्यकर्त्यांचा योग्य तो मान-सन्मान राखला जाईल आणि त्यांच्या विश्वासावर व मेहनतीवरच कर्जत जामखेड मतदारसंघात पुन्हा एकदा स्वाभिमानाची तुतारी आम्ही सर्वजण वाजवल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास यावेळी आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here