शिवप्रतिष्ठानने केली बाजार समितीच्या आवारात डांबून ठेवलेल्या जनावरांची सुटका
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील बैल बाजारात शेतकरी माहीती व सल्ला केंद्र या जुन्या कार्यलयामध्ये रविवार दि २७ ऑक्टोबर रोजी वीस ते पंचवीस जनावरे विना अन्नपाणी चे डांबून ठेवण्यात आले होते. यावेळी शिवप्रतिष्ठानच्या मदतीने जामखेड पोलिसांनी सदरील गोवंश ताब्यात घेऊन संबंधित आरोपीनवर गुन्हा दाखल केला आहे. सर्व गोवंश खाजगी वाहनाने वनश्री गोशाळा आरणगाव ता जामखेड या ठिकाणी देखभालीसाठी पाठवण्यात आले आहेत.
जामखेड येथे दर शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड रोड याठिकाणी जनावरांचा आठवडे बाजार मोठ्या प्रमाणात भरत असतो यावेळी अनेक व्यापारी मोठ्या प्रमाणात जनावरांची खरेदी विक्री करतात. सध्या राज्य शासनाने गो मातेला राज्य मातेचा दर्जा देऊनही मोठ्या प्रमाणात गोवंश कत्तलीसाठी याबाजारात खरेदी केली जातात. यावेळी अनेक हिंदु व्यापारी दलाली घेऊन कसयांना मदत करताना आढळुन येतात, ज्यावेळी गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाताना पकडले जातात तेंव्हा मार्केटच्या खोट्या पावत्या दाखवल्या जातात हा सर्व भोंगळ कारभार जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा कित्येक वर्ष झाले चालू आहे.
काल रविवारी दि २७ ऑक्टोबर २०२४ रोजी जामखेड बैल बाजार येथील शेतकरी माहीती व सल्ला केंद्र या जुन्या कार्यलयामध्ये वीस ते पंचवीस जनावरे विना अन्नपाणी चे डांबून ठेवण्यात आले होते. यावेळी जामखेड पोलिसांनी सदरील गोवंश ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून सर्व गोवंश खाजगी वाहनाने वनश्री गोशाळा आरणगाव ता जामखेड या ठिकाणी देखभालीसाठी पाठवण्यात आले आहेत.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला निदर्शनास येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बाजर संपून दोन दिवस उलटुन गेले तरी विस ते पंचवीस गोवंश बिगर अन्न पाण्याचे कार्यालयात डांबून बांधुन ठेवले जातात व याकडे कोणाचेही लक्ष जात नाही ही खुप चिंतेची बाब आहे यावरून येथील सर्व कारभारावर शंका उपस्थित होत आहे. गोवंश कत्तलीसाठी कोणी मदत तर करत नाही ना असा प्रश्न या सर्व प्रकारावरून निर्माण होत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीने या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहीजे खोट्या पावत्या, खोटे व्यापारी, तेथे जनावरे खरेदीसाठी येणार्‍या गोर गरीब शेतकर्‍यांना स्थानिकांची होणारी दादागिरी, कत्तलीसाठी खरेदी करण्यात येणारे गोवंश या सर्व बाबींकडे कृषी उत्पन्न बाजार समिती ने येत्या काळात काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. अन्यथा हिंदु समाजाचा मोर्चा हा जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती वर काढण्यात येईल असा इशारा यावेळी पशु मानद चे अधिकारी शिवशंकर स्वामी तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तालुका प्रमुख पांडु राजे मधुकर भोसले यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here