Home क्राईम न्यूज दोघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करतोय डायरीत मजकुर लिहुन तरुणाने घेतला गळफास, तीन...

दोघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करतोय डायरीत मजकुर लिहुन तरुणाने घेतला गळफास, तीन सावकारांन विरोधात गुन्हा दाखल

दोघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करतोय डायरीत मजकुर लिहुन तरुणाने घेतला गळफास, तीन सावकारांन विरोधात गुन्हा दाखल
एका महीला सावकाराचा आरोपीत समावेश, धक्कादाय घटनेने जामखेड तालुक्यात उडाली खळबळ
जामखेड प्रतिनिधी
दोघांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करतोय आसा मजकूर डायरी मध्ये लिहुन आरणगाव येथील कालिदास अभिमन्यू मिसाळ, वय ४० वर्ष या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी तीन सावकारांन विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी व महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम नुसार जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आसुन यामध्ये एका महीला सावकाराचा आरोपीत समावेश आहे. या घटनेने जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
आलेश बाबुराव जगदाळे रा.जामखेड, भगवान रामा जायभाय, रा. वंजारवाडी, ता. जामखेड व शायरा नियमत सय्यद, रा. पाटोदा (गरडाचे) ता. जामखेड आशा तीन आरोपी सावकारांची नावे आहेत. या प्रकरणी मयताचा भाऊ जगदीश अभिमन्यू मिसाळ वय ४३ रा. आरणगाव याने वरील तीन आरोपींन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. गळफास घेऊन आत्महत्या केलेला तरुण कालिदास अभिमन्यू मिसाळ वय ४० वर्षे रा. हनुमान वस्ती, आरणगाव, ता. जामखेड यास आरोपी हे दोन वर्षांपासून त्रास देत होते. यातील आरोपी आलेश बापुराव जगदाळे याच्या कडुन मयत कालिदास मिसाळ याने दोन वर्षापुर्वी शेतीच्या कामासाठी १ लाख रु कर्ज काढले होते. त्याच्या मोबदल्यात कालिदास हा वर्षभर आरोपीच्या ट्रॉक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करीत होता. हे काम करत आसताना एखाद्या दिवशी खाडे झाले तर त्याची भरपाई कालिदास कडुन वसुल केली जात होती. यानंतर कालिदास हा आजारी पडल्या नंतर त्याचा मुलगा प्रदिप कालिदास मिसाळ हा देखील ट्रॅक्टर ड्रायवर म्हणून कामाला जात होत. एक वर्ष कालिदास व त्याच्या मुलाने चार महीने आसे मिळुन दोघांनी चौदा महीने आरोपीकडे ड्रायव्हर म्हणून काम केले होते. तरीदेखील आरोपी आलेश जगदाळे हा एक लाख रुपये कर्जाचे व्याज व मुद्दल आसे मिळुन एकुण तीन लाख रुपयांची मागणी करत होता. तसेच घरी येऊन तु मेला तरी कर्जाची रक्कम तुझ्या मुलाकडून व बायकोकडुन वसुल करेल आशी धमकी देत होता.
मागिल वर्षांपुर्वी दुसरा सावकार आरोपी भगवान रामा जायभाय रा. वंजारवाडी, ता. जामखेड याच्या कडुन मयत कालिदास मिसाळ याने घर खर्चासाठी ३० हजार रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाच्या व्याजापोटी आरोपी भगवान जायभाय हा १ लाख २५ हजार रुपयांची मागणी करत होता. तसेच तिसरी महीला आरोपी शायरा नियामत सय्यद रा. पाटोदा (गरडाचे) हीच्या कडुन देखील ३० हजार रुपये घरखर्चासाठी कर्ज घेतले होते. व्याजापोटी व मुद्दल असे मिळून एकुण ४० हजार रुपयांची मागणी करत होते.
फीर्यादीच्या भावाची परीस्थिती अतिशय हलाखीची आसल्याने तो लवकर पैसै देऊ शकत नव्हता तसेच वरील लोक मला मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करतात आसे देखील मयत कालिदास याने आपल्या भावास सांगितले होते. आखेर याच त्रासाला कंटाळून सोमवार दि १४ ऑक्टोबर रोजी पहाटे कालिदास अभिमन्यू मिसाळ याने त्याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर मयताच्या खिशात एक डायरी आढळून आली व या डायरीत एका पानावर आलेश बाबुराव जगदाळे जामखेड व भगवान रामा जायभाय यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे आपला वि. आसा लिहलेला मजकुर आढळून आला आहे.
विशेष म्हणजे फीर्यादी मयताचा भाऊ जगदीश मिसाळ हा मयत कालिदास याची बॉडी घेऊन जामखेड ग्रामीण रूग्णालयात आला त्यावेळी सकाळी ८.३७ वाजता आरोपी शायरा नियामत सय्यद रा. पाटोदा (गरडाचे) हीचा मयत कालिदास याच्या मोबाईलवर फोन आला तो फीर्यादीने उचलला असता आरोपी महीला फोनवर म्हणाली की कालिदास मिसाळ कोठे आहे, त्याच्याकडे आसलेले माझे पैसै मला पाहिजेत त्याच्याकडे फोन द्या, यावेळी फीर्यादी याने सांगितले की माझ्या भावाने आत्महत्या केली आहे आसे म्हणताच आरोपी महीलेने फोन कट केला.
या प्रकरणी आरोपींनी मयत कालिदास मिसाळ यास गेल्या दोन वर्षांपासून घेतलेले कर्ज व व्याजाची रक्कम वसुल करण्यासाठी वेळोवेळी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी करुन आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. आशी फीर्याद जामखेड पोलीस स्टेशनला मयताच्या भावाने दिल्याने वरील तीनही आरोपींन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी व महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पोलिसांनी भगवान रामा जायभाय रा. वंजारवाडी ता. जामखेड या आरोपीस अटक केली असून पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर हे करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!