आमदार रोहित पवारांना धक्का ! मधुकर राळेभात व ठाकरे गटाचे संजय काशिद यांचा भाजपात प्रवेश
जामखेड प्रतिनिधी
कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा.मधुकर राळेभात व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष संजय काशीद यांच्या सह तालुक्यातील अनेक पदाधिकारी यांनी मुंबई येथे भारतीय जनता पार्टी मध्ये प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री प्रा राम शिंदे, आ. सुरेश धस, आ. आतुल भातकळर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करण्यात आला आहे.
काल दि २३ रोजी मुंबई येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अहिल्यानगर चे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री प्रा.राम शिंदे आ. सुरेश धस, आ. आतुल भातकळर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा.मधुकर राळेभात, उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष संजय काशीद जामखेड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक मोहन पवार, दिगंबर चव्हाण, अमित जाधव खर्डा ग्रामपंचायत सदस्य महालींग कोरे, माजी सरपंच हरिभाऊ खवळे, भगवान देवकाते, शिवसेनेचे जामखेड शहर प्रमुख सुरज काळे यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी बोलताना प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की मागिल अनेक वर्षे मी शिवसेत राहिलो आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षा बरोबर संबंध होते त्यानंतर विधानसभा अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. त्यानंतर काही कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आ. रोहित पवार यांनी आम्हाला कुकडीचे पाणी देऊ मतदार संघाची बारामती करू अशी आश्वासने दिली परंतु त्याच्या कडून निराशा झाली आहे. काम करत असताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही. कुणाच्याही हाताला काम दिले आहे मानसन्मान दिला नाही त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्या कामाची पद्धत माहीत आहे संबंधही चांगले आहे त्यामुळे प्रवेश केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here