Home ताज्या बातम्या फसवणूक प्रकरणातील आरोपीस अटक करण्यास जामखेड पोलीसांची टाळाटाळ

फसवणूक प्रकरणातील आरोपीस अटक करण्यास जामखेड पोलीसांची टाळाटाळ

फसवणूक प्रकरणातील आरोपीस अटक करण्यास जामखेड पोलीसांची टाळाटाळ
लेखी आश्वासनानंतर कदम कुटुंबीयाचे जिल्हाधिकारी कार्यालया समोरील उपोषण स्थगित
जामखेड प्रतिनिधी

जामखेड पोलीस स्टेशनला तीन महिन्यापूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊनही तसेच आरोपीचा अटकपूर्व जामीन श्रीगोंदा सेशन् कोर्टाने फेटाळला आहे. परंतु आरोपी आण्णा ऊर्फ श्रीकृष्ण आदिनाथ सावंत याला अटक झालेली नाही. सदर आरोपी मोकाट फिरत आहे. याच अनुषंगाने आरोपीस तातडीने अटक करावी या मागणीसाठी पिडीत कदम कुटुंबीयाचे सोमवार दि 23 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. यानंतर सायंकाळी लेखी अश्वासन नंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले.

आरोपी कडून कदम कुटुंबीयांच्या जिवितास धोका आहे. सदर आरोपी वारंवार धमकी देतो. गुन्हा दाखल होवून तीन महिने झाले तरी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील हे गुन्हेगारास वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आसा गंभीर आरोप देखील उपोषण करणाऱ्या कदम कुटुंबीयांनी केला आहे. लवकरात लवकर आरोपीला अटक करावी म्हणून कदम कुटुंबीयानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते.
याबाबत माहिती अशी की,जामखेड येथील सौरव कदम यांच्याकडून नोकरी लावण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन अण्णा सावंत यांने फसवणूक केली होती. झालेल्या फसवणुकीचा जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात होती. यासाठी कदम कुटुंबाला सावंत याच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर कुटुंबासहित उपोषणास बसावे लागले होते.
याची दखल घेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशावरून जामखेड पोलीस स्टेशनमध्ये अण्णा सावंत याच्यावर 25 जून 2024 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर आरोपीने अटकपूर्व जामीनासाठी श्रीगोंदा न्यायालयात धाव घेतली होती परंतु श्रीगोंदा सेशन कोर्टाने त्याचा जामीन फेटाळला आहे. अण्णा सावंत हा आरोपी मोकाट फिरत आहे, गुन्हा दाखल होऊन तीन महिने झाले तरीही जामखेड पोलिसांना आरोपी पकडण्यास अपयश आले आहे. जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील हे आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप फिर्यादी सौरव कदम व त्याच्या कुटुंबाने जिल्हाधिकारी यांना दिलेला निवेदनात केला आहे.
आरोपी अण्णा सावंत यांच्याकडून आमच्या कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी फिर्यादी सौरव कदम, विठ्ठल किसन कदम, अलका नामदेव शिंदे सर्व राहणार जामखेड हे कुटुंबा सहित जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्याय मागण्यासाठी बेमुदत आमरण उपोषणास बसले होते. यानंतर कदम कुटुंबीयांना जिल्हाधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले. यासंदर्भात फसवणूक प्रकरणातील मोकाट आरोपी अण्णा सावंत याच्या जामखेड पोलीस मुसक्या केंव्हा आवळणार याकडे जामखेड करांचे लक्ष लागले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!