कर्जतमधील विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण, माता-भगिनींसाठी रक्षाबंधन सोहळा
आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन
जामखेड /कर्जत. ता. २३- आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून कर्जत-जामखेड मतदारसंघात केलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच मतदारसंघातील माता-भगिनींसाठी ‘बंधन-नातं विश्वासाचं, सन्मानाचं’ या रक्षाबंधन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रसिद्ध गायक जुईली जोगळेकर आणि इंडियन आयडल फेम रोहित राऊत यांच्या मराठी व हिंदी गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला बारामती लोकसभेच्या खा.सुप्रिया सुळे आणि अहिल्यानगरचे खा.निलेश लंके उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम कर्जत तालुक्यातील पाटेगाव येथे रविवारी (२५ ऑगस्ट) सकाळी १० वाजता होणार आहे.
आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून कर्जत-जामखेडमध्ये गेल्या पाच वर्षात कोट्यावधी रुपयांची विविध विकासकामे मंजूर करून करून ती पुर्ण करण्यात आली. यामधे कर्जतमधील व्यापारी संकूलसाठी ९ कोटी रुपये निधी मंजूर करून आणला असून याठिकाणी ११६ गाळे बांधण्यात येत आहेत. कर्जतमध्ये विविध सरकारी कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या उभारणीचं काम हाती घेतलं असून त्यासाठी ४.९९ कोटी रुपये इतका निधी मंजूर करून आणला आहे. या इमारतीच्या माध्यमातून प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, कृषी विभाग, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक कार्यालय ही कार्यालय एका छताखाली येणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचण्यास मदत होईल शिवाय कामंही वेगाने मार्गी लागतील. कर्जत एसटी डेपो चे कामही पुर्ण झाले आहे आणि या डेपोमध्ये व्यापारी गाळे देखील काढण्यात येत असून ते गाळे मतदारसंघातील होतकरू तरुणांना व्यवसाय करण्यासाठी देण्यात येणार आहेत. यासह संत सद्गुरु गोदड महाराज भक्त निवास (५ कोटी), कर्जत उपजिल्हा रुग्णालय (४४.८४ कोटी), शासकीय विश्रामगृह (४.३८ कोटी), कर्जत नगरपरिषद इमारत (५ कोटी), पोलीस वसाहत (७.१२ कोटी), महसूल कर्मचारी निवासस्थान (१३.८० कोटी) ही कामे देखील पूर्ण झाली असून याचेदेखील लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. नुकत्याच मागच्या आठवड्यात जामखेडमध्ये झालेल्या कार्यक्रमात जामखेड नगरपरिषद, पंचायत समिती इमारत, नाना-नानी पार्क, सार्वजनिक वाचनालय आणि सामाजिक सभागृह अशा एकूण ८२ कोटी ५८ लाख रुपये खर्चाच्या कामाचे लाकार्पण करण्यात आले आहे.

यावेळी ३.८८ कोटी रुपये खर्चून पूर्ण केलेल्या कर्जत पंचायत समितीचा पहिला मजला, १ कोटी रुपये खर्चाचे स्व.जीवनराव उर्फ बापूसाहेब ढोकरीकर अत्याधुनिक अग्निशमन केंद्र या विकासकामांचे लोकार्पण आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी १९ कोटी रुपये खर्च करून सर्व सोयीसुविधायुक्त निवास्थाने उभारण्यात येणार असून या कामाचं भूमिपूजनही यावेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी व पाटेगाव येथे होणाऱ्या रक्षाबंधन सोहळ्यासाठी मतदारसंघातील नागरिक, माता- भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार रोहित पवार मित्र मंडळ यांच्याकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here