आरोपीस अटक करावी म्हणून जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन
जामखेड प्रतिनिधी
आण्णा सावंतच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला पंचवीस जून 2024 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जामखेड कोर्टाने अगोदरच जामीन फेटाळला होता. नुकताच श्रीगोंदा सेशन कोर्टाने देखील त्याचा दहा दिवसापूर्वी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे आण्णा सावंतच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच फिर्यादी कदम यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक नगर यांना आरोपीला अटक करण्यात यावी असे निवेदन दिले आहे.
आण्णा सावंत याने नोकरीचे आमिष दाखवून फीर्यादी कदम यांची पाच लाखांची फसवणूक केली असा गुन्हा जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे. माझी मंत्रालयात ओळख आहे. मी तुला आरोग्य विभागात कायमस्वरूपी सरकारी नोकरी लावून देतो असे म्हणत संभाजी ब्रिगेडचा प्रदेश उपाध्यक्ष आण्णा सावंत याच्या सह दोघा जणांनी नोकरीचे आमिष दाखवून पाच लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी आण्णा सावंत सह दोघांवर जामखेड पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादी यांनी म्हटले आहे की, आण्णा आदिनाथ सावंत व विट्ठल ज्ञानेश्वर सावंत यांना अटक झालेली नाही. सदर आरोपी जामखेड शहरात मोकाट फ़िरत आहेत या आरोपी कडून मला व माझ्या कुटुंबाच्या जीवितास धोका आहे व आरोपी मला वारंवार धमकी देतात तरी साहेबांनी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना आरोपींना अटक करण्यासाठी आदेश देण्यात यावेत. अशी विनंती फिर्यादी यांनी केली आहे.
फिर्यादीस नोकरी लावतो म्हणून आरोपींकडून पैसे घेतले आहेत. पण नोकरी नाही व पैसेही परत दिलेले नाहीत यामुळे फिर्यादी ने आरोपींविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मार्च-2024 मध्ये तक्रारदार त्याच्या वडिलांसह आरोपीच्या घरी गेलो होतो पण घराला कुलूप होते. 14 एप्रिल 2024 रोजी फिर्यादीसह त्याचे वडील व इतर नातेवाईकांनी अर्जदार क्रमांक १ च्या घरी जाऊन मागणी केली पैसे परत द्या पण त्यांनी शिवीगाळ केली आणि धमकावले. त्यानंतर, कारण तक्रारदाराने त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
तक्रारदार आणि प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी धनादेश त्यांनी दिला अर्जदार क्रमांक 1 द्वारे काढलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे रु.5,00,000/-. तक्रारदाराने तो चेक कॅनरा बँकेत जमा केला. पण त्याचा अनादर करण्यात आला. धनादेश जारी करताना तक्रारदाराला रक्कम परत न मिळाल्याने त्यांनी कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी सौरभ कदम हे ग्रामीण रूग्णालयात कंत्राटी तत्वावर डेटा ऑपरेटर म्हणून काम करत आहे.