बेपत्ता आसलेल्या तरुणाची साकत घाटात गळफास घेऊन आत्महत्या.
जामखेड प्रतिनिधी
दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता असलेल्या तरूणाने साकत घाटात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. परिसरातील लोकांना गळफास घेतलेला व्यक्ती दिसला ताबडतोब पोलीस स्टेशन व सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना कळविले. ताबडतोब संजय कोठारी स्वत: ची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
गळफास घेतलेल्या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव राजू संतराम सावंत रा. भवरवाडी ता. जामखेड जिल्हा अहमदनगर वय 34 हल्ली रा. कुंभारतळ जामखेड असे आहे. मयत राजू सावंत हा बहुरूपी व्यवसाय करुन आपली उपजीविका करत होता. त्याच्या मागे आई वडील, दोन भाऊ, पत्नी दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
मृत व्यक्तीस संजय कोठारी यांनी केली मदत जामखेड पासून दहा किलोमीटर अंतरावर साकत घाटामध्ये एका झाडाला गळफास घेऊन राजू संतराम सावंत वय ३४ राहणार कुंभार तळ गोरोबा टाकी जवळ जामखेड तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर हा २०/८/२०२४ पासून बेपत्ता होता. आज दुपारी चार वाजता तेथील लोकांनी त्यास पाहिले असता त्यांनी पोलिसांना कळवले जामखेड येथील पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल संतोष कोपनर यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोन करून रुग्णवाहिका मागवली.
कोठारी आपले मित्र दीपक भौरे, सचिन खामकर यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले सादरील व्यक्तीची ओळख पटवून नातेवाईकास कळविण्यात आलेले आहे. सदर मृतदेह कोठारी यांनी स्वतः आपल्या रुग्णवाहिकेत आणून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील करत आहेत यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे कौतुक केले कोठारी म्हणजे खरोखरच देवदूत आहेत. रात्री अपरात्री केव्हाही सर्वात अगोदर अपघात स्थळी कोठारी हजर असतात. आणि मदत करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here