जामखेड तालुक्यातील गंभीर गुन्ह्यातील 6 जणांनवर 1 वर्षांसाठी तडीपारीची कारवाई
जामखेड प्रतिनिधी
खुनाचा प्रयत्न करणे, अग्निशस्रा सारखे घातक शस्त्रे जवळ बाळगत गैर कायदयाची मंडळी जमवुन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करुन अनुसुचित जमातीच्या व्यक्तीचा खुनाचा प्रयत्न करणे, शासकीय नोकरी करत असलेल्या कामात अडथळा निर्माण करुन त्यांस शिवीगाळ दमदाटी करणे, गैरकायदयाची मंडळी जमवुन खंडणी मागणे, हत्यारासह दरोडा टाकणे तसेच अग्णीशस्त्रासारखे घातक शस्त्रे जवळ बाळगणे असे विविध गुन्हे दाखल असलेल्या जामखेड पोलीस स्टेशन हददीतील सहा गुंडाना जामखेड पोलीसांनी तडीपार केले आहे.
तसेच रेकॉर्डवरील इतर १० ते १२ गुंडांना आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने तडीपार प्रस्ताव पाठवण्याचे काम सुरु असल्याची माहिती जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जामखेड पोलीस स्टेशन हददीतील अभिलेखावरील गुन्हेगार आरोपी तुषार हनुमंत पवार, (वय १९) वर्ष रा. जांबवाडी ता. जामखेड, अक्षयकुमार अभिमान शिंदे, (वय-२४) रा. पोकळेवस्ती जामखेड, किरण ऊर्फ खंड्या रावसाहेब काळे, (वय-२८) रा. मिलींदनगर, जामखेड, नितीन रोहिदास डोकडे, (वय-३०) रा. गोरोबा टॉकीज शेजारी, ता. जामखेड, रमेश राजेंद्र काळे, (वय-३८) रा. गोरोबा टाँकीज जवळ जामखेड, सिध्दांत ऊर्फ भाऊ राजु डाडर (वय-४६) वर्षे रा. आरोळेवस्ती जामखेड असे तडीपार केलेल्या गुंडाची नावे आहेत.
या गुंडांवर खुनाचा प्रयत्न करणे, अग्नीशस्त्र सारखे घातक शस्त्रे जवळ बाळगुन गैर कायदयाची मंडळी जमवुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करुन अनुसुचित जमातीच्या व्यक्तीचा खुनाचा प्रयत्न करणे, शासकीय नोकर करत असलेल्या कामात अडथळा निर्माण करुन त्यांस शिवीगाळ दमदाटी करणे, गैर कायदयाची मंडळी जमवुन खंडणी मागणे, हत्यारासह दरोडा टाकणे तसेच अग्णीशस्त्रासारखे घातक शस्त्रे जवळ बाळगणे असे विविध कलमान्वये गुन्हे केल्यानं जामखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपी विरोधात जामखेड पोलीसांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 व कलम 56 अन्वये पोलीस अधिक्षक अहमदनगर तसेच उपविभागीय अधिकारी कर्जत विभाग कर्जत यांचेकडे तडीपार प्रस्ताव सादर केले. सदर प्रस्तावांवर पोलीस अधिक्षक व उपविभागीय अधिकारी यांनी सुनावणी घेवुन सदर प्रस्तावातील सर्व सहाही आरोपींना अहमदनगर, नाशीक, बीड व संभाजीनगर जिल्हयातुन प्रत्येकी एक वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे.
तसेच रेकॉर्डवरील इतर १० ते १२ गुंडांना आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने तडीपार प्रस्ताव पाठवण्याचे काम सुरु आहे. तसेच वर नमुद तडीपार केलेल्या आरोपींपैकी कोणी आरोपी तडीपार केलेल्या कार्यक्षेत्रात वावरत आल्यास जामखेड पोलीस स्टेशन फोन क्र. 02421-221033 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
ही कारवाई अहमदनगर पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, पोलीस हेडकॉन्टेबल बिरप्पा करमल, अजय साठे, पोलीस काॅन्स्टेबल अमोल आजबे, सचिन पिरगळ, दत्तु बेलेकर यांनी केली आहे.