शाळेच्या रस्त्याची झाली दुरावस्था, चिखल तुडवत विद्यार्थीना यावे लागते शाळेत
जामखेड प्रतिनिधी
आनेक वेळा गोडाऊन गल्ली येथील नविन मराठी प्राथमिक शाळेच्या समोरील उघड्या नाल्यामध्ये सिमेंटच्या नळ्या टाकुन अंडरग्राऊंड कराव्यात व बाजुला असलेल्या रस्त्यावर चिखल झाला असल्याने त्या ठिकाणी मुरूम टाकण्यात यावा अन्यथा पालक व विद्यार्थींनसमेत मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शाळेच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड शहरातील नवीन मराठी प्राथमिक शाळा, गोडाऊन गल्ली या ठिकाणी विद्यार्थींना शाळेत येणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे अतिशय चिखलमय रस्ता झाला आहे. या ठीकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आसुन त्या ठिकाणी नालीचे व पावाचे पाणी साठून डबके तयार झाले आहेत. अनेक वेळा विद्यार्थी देखील या चाखलात पडुन जखमी झाले आहेत.
विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून शाळेत येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे याबाबत मागील वर्षीपासून शाळेने जामखेड नगर परिषदेस रस्ता दुरुस्ती व उघड्या नाल्या आहेत त्या ठिकाणी मोठ्या नळ्या टाकुन नाली अंडरग्राऊंड करावी यासंबंधी लेखी पत्र दिले आहेत. मात्र या पत्राला जामखेड नगरपरिषदेकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. परिणामी या ठिकाणी शाळेतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना येथील रस्त्यात वरून चिखल तुडवत शाळेत यावे लागते तसेच बाजूची नाली फुटल्याने देखील या नालीचे सांडपाणी संपूर्ण रस्त्यावर येत असल्याने त्या ठिकाणी डब्याचे व तळ्याचे स्वरूप आले आहे. हेच नालीचे घाण सांडपाणी रस्त्यावर आल्याने विद्यार्थ्यांना या घाणीमधून पायी यावे लागत आहे. तसेच या घाणीचा वास व दुर्गंधी सुटल्याने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नविन मराठी प्राथमिक शाळा गोडाऊन गल्ली शाळेच्या समोरील गेट समोर गेल्या अनेक वर्षांपासून उघड्या गटारी असल्याने त्यामुळे देखील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच बालवाडीतील विद्यार्थ्यांना या नालीच्या बाजूने जाताना देखील धोका निर्माण झाला आहे या ठिकाणी तातडीने शाळेच्या गेटच्या समोरील नाल्यांनमध्ये मोठ्या नळ्या टाकून बुजून घ्याव्यात व शाळेच्या येणाऱ्या रस्त्यावर नालीची दुरुस्ती करून या रस्त्यावर मुरूम टाकण्यात यावा. अशी ही मागणी पालक व शिक्षकांकडून होत आहे. तसेच लवकरात लवकर ही दुरुस्ती झाली नाही व शाळेचा रस्ता दुरुस्त झाला नाही तर येणाऱ्या काळात पालक व विद्यार्थ्यांसमवेत मोठे आंदोलन करण्याचा इशारा देखील शाळेकडून देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here