कर्जत जामखेड मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार व भावी आमदार रोहितदादा पवार हेच राहणार, विजयसिंह गोलेकर यांचा निर्वाळा
जामखेड प्रतिनिधी
गेल्या कित्येक वर्षांपासूनचा भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघात जबरदस्त परिवर्तन घडवत आ.रोहितदादा पवार निवडून आले व त्यांनी या मतदारसंघाला राज्यात नव्हे तर देशात वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आ. रोहित दादा पवार हेच विधानसभेचे उमेदवार असतील यात शंका घेण्याचे कोणतेच कारण नसल्याचा निर्वाळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार चे जामखेड तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी दिला.
कर्जत येथे कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत विधानसभेसाठी ॲड. कैलास शेवाळे यांच्या उमेदवारीची मागणी केली या पार्श्वभूमीवर गोलेकर यांनी ही माहिती दिली. आ. रोहितदादा पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असून त्यांच्यावर आघाडीच्या अनेक नेत्यांच्या प्रचाराची जबाबदारी असणार आहे. पुढचे सरकार महाविकास आघाडीचेच राहणार असल्याची खात्री प्रत्येक कार्यकर्त्याला असून त्यामध्ये महत्वाचे मंत्री पद आ. रोहित दादा पवार यांना मिळणार असताना उमेदवार बदलीची चर्चा निष्फळ ठरणार असल्याचेही गोलेकर यांनी सांगितले.
गेल्या निवडणुकीत आ. रोहित दादा पवार हे ‘जायंट किलर’ ठरले. त्यांनी कर्जत जामखेड सारख्या आव्हानात्मक मतदारसंघाची निवड करत तत्कालीन कॅबिनेट मंत्र्यांचा दारुण पराभव केला. त्यानंतर या मतदारसंघात त्यांनी विकास कामांचा धडाका लावला. अनेक वर्षांपासूनचे प्रश्न निकाली काढले. सरकार गेल्यानंतर संघर्षाची भूमिका घेत, ईडी किंवा इतर दबावतंत्रांपुढे न झुकता लढाऊ वृत्ती दाखवत स्वाभिमानी बाणा जपला. ही संघर्षाची प्रेरणा माझ्या मतदारसंघातील जनतेकडून मिळाल्याची मोठेपणाने जाहीर कबुली दिली. पक्ष फुटल्यानंतर स्वतः च्या राजकीय फायद्यासाठी निष्ठा न बदलता आजोबा शरदचंद्र पवार यांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला.
मतदारसंघातीलच नव्हे तर राज्यातील, देशातील युवा, विद्यार्थी, शेतकरी, महिला, उपेक्षित यांच्या साठी कायम केंद्र सरकार तसेच राज्य सरकारमधील मंत्री, नेत्यांना अंगावर घेतले. राज्यात संघर्ष यात्रा काढत सरकारच्या चूकीच्या धोरणांना वेळोवेळी विरोध केला.
पहिल्या टर्म मधील एखादा लोकप्रतिनिधी किती चांगले काम करु शकतो, सरकारला धारेवर धरु शकतो याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणून आ. रोहितदादा पवार हे अख्खा देशात ओळखले जातात. असा लोकप्रतिनिधी, नेता एखाद्या मतदार संघाला लाभणे व सर्व सामान्य जनतेनेही तेवढ्याच उत्कटतेने त्याच्यावर प्रेम करणे हे फक्त आ.रोहित पवार यांच्या बाबतच होऊ शकते असेही श्री.गोलेकर म्हणाले. कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची काही नाराजी असल्यास ती चर्चेने दूर होईल अशी खात्री असल्याचेही गोलेकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here