रोखठोक जामखेड….. 

शहरातील दोन तरुणांकडे बेकायदेशीर बाळगत आसलेल्या व विक्री करण्यासाठी आणलेल्या पंचान्नो हजार रुपये कीमतीचे चार पिस्टल व सहा जीवंत काडतुसे अढळुन आली आहेत. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या मागे पिस्टल विक्री करण्याचे मोठे रॉकेट आहे का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. या बाबत ची माहीती कर्जत जामखेड चे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन  दिली.

ऋषी उर्फ (पप्पू) मोहन जाधव वय 22 वर्षे राहणार जामखेड व दीपक अशोक चव्हाण व 32 वर्षे रा. तपनेश्वर गल्ली जामखेड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी पुढे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की जामखेड शहरात अवैद्यरित्या बंदुकीची खरेदी विक्री होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात यांच्या सह पो.हे.कॉ संजय लाटे, आबासाहेब आवारे, संग्राम जाधव, अविनाश ढेरे, विजयकुमार कोळी, अरुण पवार, संदिप राऊत, संदिप आजबे, विष्णू चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन खातरजमा केली. या नंतर आरोपी ऋषी उर्फ (पप्पू) मोहन जाधव यांच्या तपनेश्वर गल्ली येथील रहात्या घरामध्ये छापा टाकला आसता या वेळी घेण्यात आलेल्या झाडाझडतीत त्या घरात विनापरवाना बेकायदा मनाई केलेले 7.62 एम एम ची 25200 रुपये किमतीचे 1 अग्निशस्त्र पिस्टल व 2 जिवंत काडतुसे मिळुन आली. त्याने ही शस्त्रे दिपक चव्हाण रा. तपनेश्वर गल्ली याच्या कडुन खरेदी केली आसल्याचे सांगितले. त्या नुसार दुसरा आरोपी दीपक अशोक चव्हाण यास ताब्यात घेऊन त्याच्या घराची झाडाझडती घेतली आसता त्याच्या कडे 70400 रुपये किमतीचे एकूण 3 पिस्टल व 4 जीवंत काडतुसे अशी विक्री करण्याच्या उद्देशाने मिळुन आली. दि 12 रोजी पोलिसांनी ही पिस्टल आरोपींच्या घरी छापा टाकून जप्त केली आहेत. शहरात अनेक वेळा बेकायदेशीर रील्हॉलवर वापरून गुन्हा केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच पुन्हा चार पिस्टल पोलीसांनी जप्त केल्या आहेत. आता याचे मोठे रॉकेट तर नाही ना याचा तपास पोलीस करीत आहेत.

या प्रकरणी पो.कॉ आबासाहेब आत्माराम आवारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ऋषी उर्फ पप्पु मोहन जाधव व दिपक अशोक चव्हाण दोघे रा तपनेश्वर गल्ली यांच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात हे करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here