रमेश (दादा) आजबे व गणेश पवार यांच्या कडुन श्री नागेश विद्यालयास दिले मोफत वीस डसबीन
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील श्री नागेश विद्यालयात कचरा साठवण्यासाठी डजबीन आडचण लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे व जे. पी कंस्ट्रक्शन चे संचालक गणेश पवार यांच्या तर्फे शाळेस मोफत वीस डसबीन देण्यात आले.
शाळांमधील स्वच्छतेच्या पद्धतींचा विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रेरणेवरही थेट परिणाम होतो. स्वच्छ आणि सुस्थितीत असलेले शाळाचे वातावरण विद्यार्थ्यांमध्ये अभिमान आणि जबाबदारीची भावना निर्माण करते. विद्यार्थी आणि शिक्षक दोघांसाठी सुरक्षित आणि निरोगी वातावरण निर्माण करण्यासाठी शाळेतील स्वच्छता महत्त्वाची आहे. याच अनुषंगाने शाळेतील स्वच्छता कायम चांगली रहावी यासाठी जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे व जे पी कंस्ट्रक्शन चे संचालक गणेश पवार यांनी शाळेतील कचरा टाकण्यासाठी वीस डजबीन श्री नागेश विद्यालयास मोफत दिले आहेत.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना व विद्यार्थीना मार्गदर्शन करताना सांगितले की या शाळेचा मी देखील माजी विद्यार्थी आहे. शाळेच्या आडचणी कायम सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. त्यामुळे शाळेतील कचरा साठवण्याची आडचण लक्षात घेऊन आम्ही शाळेस वीस मोफत डजबीन दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थींनी देखील या डजबीन चा योग्य वापर करून या डजबीन मध्येच कचरा गोळा करून शाळेची स्वच्छता कशी राहील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे, जे पी कंस्ट्रक्शन चे संचालक गणेश पवार, मुख्याध्यापक मडके सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल बहीर, उपाध्यक्ष अशोक यादव, राजुरीचे सरपंच सागर कोल्हे, दादासाहेब कदम, प्रदिप अडाले, सुग्रीव सांगळे, सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here