पालकांनी मुलांना अभ्यासाला बसवू नये तर अभ्यास करून घ्यावा -मा. शिक्षण संचालक श्री. दिनकर टेमकर
जामखेड प्रतिनिधी
आज प्रत्येक पालकांनी मुलांना मोबाईल पासुन दूर ठेवावे. त्यांना फक्त अभ्यासाला बसवू नये तर त्यांच्या जवळ बसून अभ्यास करून घ्यावा तसेच मुलांना त्यांच्या मताप्रमाणे क्षेत्र निवड करून द्यावे व असे मत महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक श्री. दिनकर टेमकर यांनी केले.
लोकमान्य तरुण, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संचलित, नवीन मराठी प्राथमिक शाळा जामखेड या ठिकाणी इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी च्या शिष्यवृत्ती धारक झालेल्या व इतर स्पर्धा परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांच्या तसेच मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार समारंभ प्रसंगी व्यक्त केले.
या कार्यक्रमास बीड जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. नागनाथ शिंदे, आष्टी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव, संस्थेचे अध्यक्ष रमेश गिरमे, कोषाध्यक्ष उमेश (काका) देशमुख, संचालक बंडोपंत पवार, शाळेच्या मुख्याध्यापिका मीना राळेभात, सर्व शिक्षक, यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बांगर सर यांनी केले तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. राळेभात मॅडम यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here