कन्याविद्यालय पाचवीच्या नवीन विद्यार्थिनींचे बैलगाडीमधून मिरवणूक काढत केले स्वागत
जामखेड प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे कन्या विद्यालय येथे आज दि १५ जून २०२४ रोजी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. यावेळी पाचवीच्या नवीन विद्यार्थिनींचे गुलाब पुष्प व नवीन पुस्तके देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी स्कूल कमिटी सदस्य प्रा. मधुकर राळेभात, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, मुख्याध्यापिका सौ. के. डी चौधरी मॅडम, पर्यवेक्षक संजय हजारे, गुरुकूल प्रमुख बाबासाहेब आंधळे, सुनील वारे, सुग्रीव ठाकरे, मनोज पोकळे ,विलास पवार, आदी शिक्षक, शिक्षिका पालक व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बैलगाडीतून मिरवणूकीचे संकल्पना संतोष सरसमकर यांची होती. तर गुरुकूल प्रमुख बाबासाहेब आंधळे हे वाहक अर्थात गाडीवान होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका के. डी .चौधरी यांनी केले व सुत्रसंचलन संतोष सरसमकर तर आभार प्रदर्शन शंभूनाथ बडे यांनी मानले. यावेळी नवीन पाचवीच्या मुलींचे सजवलेल्या बैलगाडीत बसून प्रांगणात मिरवणूक काढण्यात आली. अनेक पालकांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी दहावीच्या मुलींनी पाचवीच्या मुलींचे स्वागत केले.