संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पाठिंबा.
आन्यथा जामखेड तालुक्यात साखळी उपोषण सुरू करणार.
जामखेड प्रतिनिधी
सरकारने व प्रशासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची गंभीर दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात आन्यथा जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गावोगावी साखळी उपोषण करण्याचा इशारा तहसीलदार गणेश माळी यांना दिलेल्या निवेदनात इशारा दिला आहे.
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे गेल्या आठ तारखेपासून आंतरवली सराटी येथे सरकारने सगेसोयरऱ्यां बाबत अध्यादेशाचा कायदा पारित करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण लागू करून त्याची आमलबजावनी करावी यासाठी पुन्हा अमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या उपोषणास जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. तसेच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे सरकार व प्रशासन दुर्लक्ष करत आसल्याचे दिसुन येत आहे.