जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील खर्डा आणि कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस स्टेशनला शासनाची मान्यता मिळाली आहे. या साठी आ. रोहित पवार यांनी पाठपुरावा केला होता अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

जामखेड तालुक्यातील खर्डा आणि कर्जत तालुक्यातील मिरजगाव या ठिकाणी नवीन स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण करण्यासाठी गुरु मंडळाने परवानगी दिली असून, आता खर्डा आणि कर्जत तालुक्यातील मिरजगाव या ठिकाणी स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण होणार आहेत. या दोन्ही पोलिस ठाण्यांमध्ये 70 कर्मचारी देण्याचा निर्णय ही गृह मंत्रालयाने दिला असून लवकरच आता खर्डा पोलीस स्टेशन आणि मिरज पोलीस स्टेशन कार्यान्वित होतील यामुळे जामखेड आणि कर्जत तालुके चित्र पाने मोठी असल्याने अनेक वेळा पोलिस संख्या अभावी तपास कामांमध्ये अनेक समस्या निर्माण होत होत्या मात्र आता दोन्ही तालुक्यांचे पोलिस स्टेशनचे विभाजन झाल्याने पोलीस बळ भेटल्याने तेथील नागरिकांच्या समस्या दूर होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here