पिंपरखेड येथे भरदिवसा पावणेदोन लाखांची चोरी
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील पिंपरखेड शिवारातील शिंदे वस्ती येथे राहाते घराचे कुलूप तोडून घरातील सामानाची उचकापाचक करून प्रसुतीसाठी आलेल्या विवाहितीचे १ लाख ७० रुपये किमतीचे दागिने दिवसा ढवळ्या चोरून नेले असल्याची फिर्याद विठ्ठल ज्ञानदेव शिंदे, शिंदे वस्ती, पिंपरखेड यांनी दिली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली आहे. फीर्यादी मध्ये म्हटले आहे की, सासरी बाळंतपणासाठी आलेल्या मुलची जामखेड शहरातील एका हाॅस्पिटलमध्ये प्रसुती झाल्याने मी व माझा मुलगा तीला भेटण्यासाठी गेलो होतो. भेटून आल्यानंतर घरातील आस्ताव्यस्त पडलेले सामान व कपाटाचे तुटलेले लाॅकर पाहिल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी पोलीस स्टेशनला संपर्क केला.
या नुसार घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे गंठण, मिनी गंठण, कानातील फुले व आंगठी असा १ लाख ७० रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज कोणी तरी अज्ञात चोरटय़ाने चोरून नेला. यावरून फिर्यादी विठ्ठल ज्ञानदेव शिंदे, शिंदे वस्ती, पिंपरखेड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोध चोरीची फिर्याद देण्यात आली आहे. या चोरीच्या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश जानकर हे करत आहेत.




