उद्यापासुन धानोरा वंजारवाडी फक्राबाद येथील आणखेरी देवी यात्रा उत्सवास सुरवात.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील नवसाला पावणाऱ्या मौजे धानोरा, फक्राबाद, वंजारवाडी तसेच पंचक्रोशी चे आराध्य दैवत आसलेल्या श्री. अणखेरी देवी यात्रा उत्सव चैत्र शुध्द तृतीया चतुर्थीला म्हणजे दि २७ व २८ एप्रिल रोजी सुरवात होणार आहे. यायात्रेत भव्य कुस्त्यांचा आखाडा देखील भरवण्यात आला आहे.
श्री आणखेरी देवी यात्रा उत्सवानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असुन दि २७ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजता मौजे कुसळब ता. पाटोदा याचा महापूजेचा मान असतो तेथील भाविक भक्त कैलास महाराज व इतर याच्या हस्ते महापूजा होते, तसेच याच दिवशी पहाटे चार वाजता पंचक्रोशीतील सर्व महीला दंडवतासाठी येतात दिवसभर यात्रेस येणारे भाविक हे दर्शन घेतात. सायंकाळी ६ वा. मानाच्या काढ्या व छबिना (पालखी) मिरवणूक सवाद्य फक्राबाद, धानोरा, वंजारवाडी या तिन हि गावामधून काढण्यात येते. तसेच रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री १२ वाजता देवीची पालखी निघते दि २८ रोजी पहाटे ही पालखी ५ वा देवीवर येते त्यानंतर पालखीची सांगता होते.
रविवार दि २८ रोजी याच ठिकाणी सायंकाळी ४ वा कुस्त्यांचा हगामा भरवण्यात येतो. यात्रेसाठी बाहेरगावहून मुंबई, पुणे व इतर शहरातून भाविक दर्शनासाठी येतात. यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. तसेच श्री क्षेत्र आणखेरी देवी मंदिर धानोरा ट्रस्ट चे अध्यक्ष रंभाजी अढाव, सचिव रमेश तुपेरे, उपाध्यक्ष सोपान जायभाय, सदस्य गोपीचंद काळे, तुळशीराम पिंपळे, भगवान उबाळे, रावसाहेब जायभाय, अविनाश अढाव, भाऊसाहेब अढाव, गहिनीनाथ जायभाय, चंद्रकांत क्षिरसागर व पोलीस पाटील योगीनाथ जायभाय यांनी भाविकाना यात्रा उत्सव येण्याचे आवाहन केले आहे. या यात्रा उत्सवास कैलास महाराज पवार यांचे विषेश सहकार्य लाभले आहे. यात्रेला अंदाजे ४ ते ५ लाख भाविक दर्शनासाठी येतात..
चौकट
हेमाडपंती आसलेले श्री आणखेरी देवीचे मंदिर होते या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी तत्कालीन माजी आमदार सदाशिव लोखंडे यांनी पहिले सभामंडप देले त्यामुळे या मंदिराच्या विकासाला सुरुवात झाली त्यांनतर माजी पालकमंत्री आमदार प्रा राम शिंदे यांनी 1 कोटी 19 लाख रुपयांचा निधी देऊन या मंदिराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला तसेच आमदार रोहित पवार यांनी 13 लाख रुपयांचा निधी दिला आहे. श्री आनखेरी देवी या ट्रस्टची स्थापना करण्यात आली आणि सर्वीना विश्वासात घेऊन ट्रस्टचे अध्यक्ष रभांजी आढाव व सचिव रमेश तुपेरे व सर्व संचालकांनी विकासासाठी आपले योगदान दिले त्यामुळे या आणखेरी देवी मंदिराचा विकास होत आहे.