पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागला, ऊसतोड युवकाने केली आत्महत्या; पंकजाताईंचा कार्यकर्त्यांना धीर
बीड: पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील ऊसतोड कामगार युवक पांडुरंग रामभाऊ सोनवणे (वय -३३) याने रविवारी सकाळी शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतरच पांडुरंग आत्महत्या करण्यासाठी निघाला होता. मात्र गावचे सरपंच व इतरांनी त्याची समजूत काढली होती.
बीड लोकसभा मतदार संघातील मतमोजणी झाली. यात भाजपा च्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला. या पराभवाचे शल्य मनात बोचत असल्याने व हा पराभव जिव्हारी लागल्याने अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील युवकाने शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.
पांडुरंग सोनवणे हा अत्यंत गरीब कुटुंबातील युवक होता. तो भारतीय जनता पक्ष व पंकजा मुंडे यांचा कट्टर समर्थक होता. हा पराभव त्याने खूप मनाला लावून घेतला.व जीवनयात्रा संपविली. पांडुरंग हा अल्पभूधारक आहे.त्याच्या कुटुंबात आई, वडील, पत्नी व एक मुलगी व लहान मुलगा आहे. या दुर्घटने मुळे पांडुरंग यांच्या कुटुंबावर संकट ओढवले आहे.
मतमोजणी दिवशीच केला होता आत्महत्येचा प्रयत्न….
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर पांडुरंग सोनवणे हा पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर खूप दुःखी झाला होता. त्याच दिवशी त्याने आत्महत्या करणार असल्याचे ग्रामस्थांना बोलून दाखविले. गावचे सरपंच बाळासाहेब सोनवणे व ग्रामस्थांनी त्याची समजूत काढली. व त्याला आत्महत्येचा विचार मनातून काढून टाक.अशी विनंती ही केली होती. मात्र निराश झालेल्या पांडुरंग याने शेवटी आत्महत्या केली.
या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली असुन पंकजाताई समर्थक अजुनही पराभवातून सावरले नाहीत मात्र जय पराजय हा होतच असतो. कोणीही आसे टोकाचे पाऊल उचलु नये असे आवाहन सोशल मिडीयाच्या माध्यमातून होऊ लागला आहे.
पंकजाताईंचा कार्यकर्त्यांना धीर
स्वतः च्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही …मी लढत आहे संयम ठेवत आहे तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा..कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी??मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे … मी स्वीकारला आणि पचवला आहे पराभव तुम्ही ही पचवा!! ..अंधारी रात्री नंतर सुंदर प्रकाश असतो तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात.. शांत व सकारात्मक रहा please please..माझ्या साठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा… आई बापाला दुःख देऊ नका.. त्यांच्या जीवाला घोर लावू नका.. तुम्हाला शप्पथ आहे..मुंडे साहेबांची….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here