Home ताज्या बातम्या जामखेड बसस्थानका समोर आनेक दिसांनपासुन राजरोस वेश्या व्यवसाय सुरू

जामखेड बसस्थानका समोर आनेक दिसांनपासुन राजरोस वेश्या व्यवसाय सुरू

जामखेड बसस्थानका समोर आनेक दिसांनपासुन राजरोस वेश्या व्यवसाय सुरू
जामखेड प्रतिनिधी
मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून जामखेड शहराची ओळख आहे मात्र याच शहरातील जामखेड बसस्थानका समोर राजरोसपणे काही महीला वेश्या व्यवसाय करत आहेत. सदरचा वेश्याव्यवसाय हा बस स्थानका समोरील लॉज मध्ये खुलेआम सुरु आहे. मात्र जामखेड पोलीसांना हे दिसत नाही का? बस स्थानक परिसरातील प्रवासी व नागरीकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून जामखेड शहराची ओळख आहे. त्यामुळे जामखेड बसस्थानकात रात्रंदिवस एस टी बस व प्रवाशांची वर्दळ असते. नावाजलेल्या या जामखेड बस स्थानका समोरील चहाच्या टपरीवर देहविक्री करणार्‍या काही महीला थांबलेल्या आसतात. याठिकाणी एखादे ग्राहक आले की त्या ग्राहकांना बस स्थानका समोरील असलेल्या लॉज मध्ये भरदिवसा घेऊन जातात व देहविक्रीचा व्यावसाय करतात.
बस स्थानका समोर चाललेल्या या खुलेआम वेश्या व्यवसाय पोलिसांना दिसुन येत नाही का? स्थानिक पोलिसांकडून‘अर्थपूर्ण’गोष्टीमुळे दुर्लक्ष केले जात आहे. या वेश्या व्यवसायामुळे परीसरातील प्रवासी वैतागून गेले आहेत. खाजगी मध्ये या महीला सांगतात की आम्ही हाप्ते देतो आम्हाला काय कोणाची भीती आहे. जामखेड येथील इतर लॉजवर देखील अनेक प्रकार होत आहेत. त्यामुळे शहरासह तालुक्यातील लॉज मध्ये देखील योग्य तपासणी करून जर या ठिकाणी काही अवैध प्रकार दिसुन आला तर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरीकांन कडुन होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!