जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने 3 जून 2024 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन.
जामखेड प्रतिनिधी
दरवर्षी प्रमाणे 1 मे महाराष्ट्र दिन निम्मित जामखेड पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येत असते. परंतु यावर्षी लोकसभा निवडणुक कामात व्यस्त असल्याने 1 मे ला रक्तदान शिबीर आयोजित करता आले नाही. त्यामुळे 3 मे रोजी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी तरुणांमध्ये देशाप्रती, समाजाप्रती, भारत राष्ट्राप्रती प्रेमाची आणि त्यागाची भावना जागृत राहण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशन च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. आजच्या काळात विविध आजारांचे प्रादुर्भाव वाढले असून रक्तदात्यांची संख्या त्या प्रमाणात कमी आहे. परिणामी, नेहमीच रक्ताची कमतरता भासते. (1 मे महाराष्ट्र दिन) या दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रक्तदान शिबिराची संख्याही कमी झाली आहे. स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांच्या मनात ही असुरक्षितता निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे लोकांमध्ये रक्तदानाविषयी जनजागृती करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 3 जून 2024 वार सोमवार रोजी सकाळी 10 ते 05 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जामखेड शहरासह तालुक्यातील सर्व राजकीय संघटना, सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, मेडिकल संघटना, वैद्यकीय सेवा संघटना, रिक्षा चालक संघटना, नाभिक संघटना, गॅरेज मेकॅनिक संघटना, हॉटेल मालक संघटना, विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध खेळातील खेळाडू, NCC/NSS छात्र, पेट्रोल पंप मालक संघटना, मंगल कार्यालय संघटना, शासकीय कर्मचारी व युवा तरूणांनी या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन जामखेड पोलीस स्टेशन यांचेकडून रक्तदात्यांना केले आहे. रक्तदान करण्यास इच्छुक आसणार्‍यांनी नावनोंदणीसाठी संपर्क पो. ना.अविनाश ढेरे मो. क्रमांक. 8888837545 पो. कॉ. प्रकाश जाधव मो. न. 8806623459
आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक आजारी व्यक्तींना रक्ताची गरज असून कोणत्याही माणसाला रक्ताची उणीव भासू नये . यामुळे “मी रक्तदान करणार, तुम्हीही रक्तदान करा आसे अवहान जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here