स्व एम ई भोरे ज्युनिअर कॉलेज , पाडळी व संभाजीराजे ज्युनिअर कॉलेज, देवदैठण येथील बारावीचा लागला १००% निकाल
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील पाडळी येथील सनराईज मेडिकल & एज्युकेशन फौंडेशन, जामखेड संचलित स्व.एम.ई.भोरे ज्युनिअर कॉलेज,(कला व विज्ञान) पाडळी फाटा (जामखेड) संभाजीराजे ज्युनिअर कॉलेज, (विज्ञान) देवदैठण जामखेड येथे बारावीच्या परीक्षेमध्ये उज्वल यशाची परंपरा कायम राखत बारावी शाखेचा १००% निकाल लागला. बारावी कला शाखेचा ९७.५% निकाल लागला आहे. तालुक्यात तसेच जिल्ह्यात संस्थेच्या सर्व शाखेच्या गुणवत्ता व निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
यावेळी बोलताना सनराईज मेडिकल & एज्युकेशन फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय भोरे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने जिद्दीच्या जोरावर तसेच आई-वडील आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाने त्यांचं भविष्य उज्वल होणारच आहे. व संस्था विद्यार्थ्यांच्या हित व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी कायम प्रयत्नशील आहेत. याप्रसंगी यशस्वी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व प्राचार्य यांचे संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ संजय भोरे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.