एक कोटींची लाच मागितल्याप्रकरणी बीडची आर्थिक गुन्हे शाखा एसीबीच्या जाळ्यात, पाच लाखाची लाच घेतना खासगी इसमास पकडले
बीड प्रतिनिधी
बीड जिल्हा पोलिस दलाची आर्थिक गुन्हे शाखा आता अडचणीत सापडली आहे. जिजामाता मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी बीड आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर बीड एसीबीने कारवाई केली आहे. तडजोडीअंती 30 लाख रु देण्याचे ठरले होते. त्या नुसार पहील्या टप्प्यात पाच लाख रूपये घेताना एका खासगी व्यक्तीला बीडच्या एसीबीने रंगेहाथ पकडले आहे.
याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिष खाडे, हे. कॉ. जाधवर व कुशाल प्रविण जैन या तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बीड एसीबीचे डीवायएसपी शंकर शिंदे यांनी हाती घेतली आहे. दरम्यान शिंदेंनी केलेल्या कारवाईमुळे जिल्हा पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
बीड जिल्हा पोलीस दलात लाचखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यातच आर्थिक गुन्हे शाखा तर पैसे कमविण्याचे कुरण झाल्याची चर्चा यापूर्वी अनेकदा झाली होती. जिल्ह्यात मागच्या काही काळात मल्टीस्टेटचे अनेक घोटाळे समोर आले. त्यात आर्थिक गुन्हे शाखेची भुमिका कायम संशयास्पद राहिली. त्यातच आता जिजामाता मल्टीस्टेटच्या प्रकरणात सहकार्य करण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांच्या लाचेची मागणी आर्थिक गुन्हे शाखेने दोघांकडून केली होती.
सदर बँकेच्या गुन्ह्यात आरोपी करत नाही, तुमची मालमत्ता जप्त करत नाही. त्या करीता एक कोटी रु द्या, अशी डीमांड दोन जणांनकडे करण्यात आली होती. या बाबतची तक्रार बीड एसीबीकडे आली होती. तडजोडीअंती 30 लाख रूपये देण्याचे ठरले होते. यापैकी पहिल्या टप्प्यात दहा लाख देण्यात येणार होते, त्यानुसार या दहा लाखापैकी पाच लाख रूपयांची लाच स्विकारताना बीडमधील खासगी इसम कुशाल प्रविण जैन यास बीड मधिल एका दुकानात बीड एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
ही लाच आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे, हे. कॉ. जाधवर यांच्या सांगण्यावरून स्विकारली आसल्याची कबुली कुशाल जैन याने दिली. त्या नुसार बीड आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे, हे. कॉ. जाधवर आणि कुशाल प्रविण जैन या तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया एसीबीकडुन रात्री उशिरा पर्यंत सुरू होती. बीड एसीबीने बीडमध्ये केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
डीवायएसपी शिंदेच्या कारवायांमुळे बीड जिल्ह्य़ातील लाचखोर अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. बीड जिल्ह्यातील आनेक लाचखोर अधिकार्‍यांना लाच घेताना रंगेहाथ पकडुन कारवायांचे दणक्यावर दणके दिले आहेत. मल्टीस्टेट बँकेच्या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी लाच मागणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेला आणि या शाखेतील अधिकार्‍यांना शिंदे यांनी काल मोठा दणका देण्याचे काम केले आहे त्यांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील लाचखोर अधिकार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here