कर्जत-जामखेड मध्ये विक्रमी ६५.८१ टक्के झाले मतदान, सहा केंद्रावर मतदान यंत्रात झाली होती बिघाड
जामखेड प्रतिनिधी
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकासाठी एकूण ६५.८१ टक्के मतदान पार पडल्याची माहिती प्रांताधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नितिन पाटील यांनी दिली. मतदान प्रक्रिया सर्व ठिकाणी शांततेत पार पडली. विविध केंद्रावर मतदारांनी रांगा लावत मतदान केले. मतदान प्रक्रियेदरम्यान जामखेडमध्ये तीन ठिकाणी तर कर्जतला ३ मतदान केंद्रावर मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट मशीन तांत्रिक कारणाने बदलावे लागेले.
२२७ कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात ३५६ मतदान केंद्रावर सरासरी ६५ टक्के मतदान झाले. सकाळ पासुनच मतदान केंद्रावर जास्तीत जास्त मतदान करुन घेण्यासाठी राजकीय मतदान प्रतिनिधी मतदारांची ने-आण करण्यासाठी वहाणांची सोय केली होती. सकाळी मतदान केंद्रावर तुरळक गर्दी पहावयास मिळत होती. तर दुपारी आणि संध्याकाळी अनेक ठीकाणी मतदारांच्या रांगा पहावयास मिळाल्या. काही मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या मतदारांनी स्वीप समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटवर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.
सर्व मतदान केंद्रावर प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्यासह कर्जत चे तहसीलदार गुरु बिराजदार, जामखेड चे तहसीलदार गणेश माळी, जामखेड गटविकासाधीकारी प्रकाश पोळ, मुख्याधिकारी अजय साळवे, तसेच ३८ क्षेत्रीय अधिकार्यांनी भेटी घेत आढावा घेतला. जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथे दोन मतदान केंद्रावर यासह फाळकेवाडी एक, तर कर्जत तालुक्यातील शिंदे, मिरजगाव आणि कर्जत येथील ३ मतदान केंद्रावर मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट तांत्रिक कारणाने बदलले होते.
कर्जत जामखेड मधिल झालेल्या मतदानाची टक्केवारी
पुरुष मतदार – 1,77,336 आहेत
माहिला मतदार – 1,59,567 आहेत
एकुण – 3,36,903 एवढी कर्जत जामखेड मतदारसंघात मतदार आहेत.
या मध्ये – 1,22,742 एवढे पुरुष मतदान झाले तर माहिला मतदान – 98,985 एवढे झाले आहे. तर
एकुण – 2,21,727 एवढे महीला पुरुष मतदान झाले आहे.
पुरुष टक्केवारी 69%.21
माहिला टक्केवारी 62%.03
आशा प्रकारे कर्जत जामखेड मतदारसंघात एकुण 65%. 81 टक्के मतदान झाले आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात 63.77 टक्के मतदान.
यामध्ये सर्वाधिक
कर्जत जामखेड : 65.81,
पारनेर 63.97 टक्के.
नगर शहर : 57.60,
राहुरी : 69.79,
शेवगाव-पार्थर्डी : 62.74
व श्रीगोंदा : 62.54