अशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मुळे जामखेडची नवी ओळख निर्माण झाली – तहसीलदार गणेश माळी
रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालयास अशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रदान.
जामखेड प्रतिनिधी
जागतिक रेकॉर्ड करणे हे अतिशय कठीण बाब असून या अशिया बुक वर्ल्ड रेकॉर्डच्या माध्यमातून जामखेडची नवी ओळख निर्माण झाली. बाहेरील व्यक्तीला जामखेड चे नाव माहित नसतं जगातील सर्वात मोठा नकाशा उपक्रम जामखेड शहरात संपन्न झाल्यामुळे जगाला या उपक्रमाची नोंद घेण्यास भाग पडले ही अभिमानाची बाब आहे असे मत तहसीलदार गणेश माळी यांनी व्यक्त केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त दि २६ जानेवारी २०२४ रोजी जगातील सर्वात मोठा मानवी विद्यार्थी चनेतील भारताचा नकाशा रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयात साकारला आला याची नोंद जागतिक पातळी वर्ल्ड रेकॉर्डच्या माध्यमातून घेतली गेली. वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटीचे सलग्न अशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली याचा सन्मान सोहळा श्री नागेश विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जामखेडचे कर्तव्यदक्ष तहसीलदार गणेश माळी, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, स्कूल कमिटी सदस्य हरिभाऊ बेलेकर, राजेंद्र कोठारी, प्रा मधुकर राळेभात, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले विनायक राऊत, डॉ सागर शिंदे, केंद्रप्रमुख- राम निकम, विक्रम बडे, नवनाथ बडे, सुरेश मोहिते, केशव गायकवाड, ग्रामसेवक जिल्हा कार्याध्यक्ष युवराज ढेरे पाटील, विकास मंडळाचे विश्वस्त मुकुंदराज सातपुते, एकनाथ चव्हाण, माजी प्राचार्य अनंता खेत्रे, प्राचार्य मडके बि के, मुख्याध्यापिका चौधरी के डी, अशोक यादव, शिवनेरीचे संचालक लक्ष्मण भोरे, क्रांतिवीरचे संचालक रावसाहेब जाधव, बाबा घोलप, सचिन कार्ले, एनसीसी प्रमुख मयूर भोसले, शिवाजीराव ढाळे, अमोल बहिर, दिपक तुपेरे सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सन्मानचिन्ह मेडल प्रमाणपत्र बॉक्स विद्यालयाचे प्राचार्य मडके बी के यांच्याकडे मान्यवरांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले. कला शिक्षक तथा एनसीसी ऑफिसर मयूर कृष्णाचे भोसले यांनी जगातील सर्वात मोठे मानवी रचनेतील भारताचा नकाशा साकारून अशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.o
कार्यक्रमाचे प्रस्ताविकामध्ये प्राचार्य मडके बी के यांनी नागेश विद्यालयाची देश पातळीवर जागतीक पातळीवर उपक्रम राबवले. विद्यार्थी स्पर्धा परीक्षा व गुणवत्तेत विद्यार्थी नेहमीच पुढे असतात, संस्था, शासकीय उपक्रम विद्यालयाचा राबवले जातात. अशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली अभिमानाची बाब आहे असे सांगितले.

कलाशिक्षक तथा एनसीसी ऑफिसर मयूर भोसले यांनी मनोगतात प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाच्या नकाशाची आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदणी झाली जगातील सर्वात मोठे भारताचा नकाशा साकारण्याचे भाग्य आम्हाला मिळाले यामध्ये नागेश व कन्या विद्यालयातील सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी एनसीसी कॅडेट यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. सर्वांचे सहकार्याने रेकॉर्ड यशस्वी झाले. रयत शिक्षण संस्थेचे, श्री नागेश विद्यालय व जामखेड चे नाव जागतिक स्तरावर चमकले असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार गणेश माळी यांनी मनोगतात जगातील सर्वात मोठा मानवी रचनेतील नकाशा साकारला ही अभिमानाची बाब असून जामखेड चे नाव जागतिक पटलावर चमकले तसेच यामध्ये 2500 विद्यार्थी – विद्यार्थीनी एनसीसी कॅडेट सहभागी झाले त्यांचे अभिनंदन.
अशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याबद्दल सर्व मान्यवरांनी अभिनंदन करून कौतुक केले. जामखेड चे नाव जागतिक पातळीवर चमकल्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. सूत्रसंचालन संभाजी इंगळे आभार प्रदर्शन निलेश अनारसे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here