रोखठोक जामखेड….
बिबट्याची दहशत संपत नाही तोच पुन्हा जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील शेतात गव्याचे दर्शन झाले. या गव्याने शेतात काम करत आसलेल्या शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केले आहे. त्यामुळे परीसरातील नागरीकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वंजारवाडी येथील जायभाय वस्ती येथे शेतकरी संतोष भिमराव दराडे हे आपल्या शेतात काम करीत असताना सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक या गव्याने शेतकर्यावर हल्ला केला. या नंतर ग्रामस्थांना देखील या गव्याचे दर्शन झाले. या नंतर ग्रामस्थांनी या गव्याचा पाठलाग केला मात्र नंतर अंधाराचा फायदा घेत गवा पळुन गेला. जखमी संतोष दराडे यांना फक्राबाद येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जंगली गव्यांचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. वनविभागाच्या वतीने या ठिकाणी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी परीसरातील ग्रामस्थांनी केली आहे. जामखेड तालुक्यात वारंवार वनवा पेटणे, सर्प अढळुन येणे, व रानडुक्करांचे नागरीकांनवर हल्ले होणे हे प्रक्रार वारंवार घडत आहेत. त्यामुळे याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडुन होत आहे.