तोडगा निघेना, आठ दिवसांपासून आंदोलन व उपोषण सुरूच आज ग्रामस्थांच्या वतीने जामखेड बंद
जामखेड प्रतिनिधी
गेल्या आठ दिवसांपासून रत्नदीप मेडिकलच्या भास्कर मोरेवर कारवाईसाठी जामखेड तहसील कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन व शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांचे उपोषणास सुरुच आहे. मात्र भास्कर मोरेला अटक व कॉलेजवर कारवाई करण्यात दिरंगाई होत असल्याच्या कारणावरून आज बुधवार दि १३ रोजी जामखेड बंद ठेवण्यात येणार आहे.
जामखेड येथे डॉ. भास्कर मोरेवर कारवाईसाठी आनेक पक्ष व विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. अनेक विद्यापीठाच्या कमीट्या डॉ भास्कर याच्या कॉलेजच्या चौकशीसाठी आल्या आहेत. कमिटी मधिल सदस्यांनी देखील कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यातच मोरेवर विनयभंग व वनविभागाकडुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून भास्कर मोरे हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार आहे.
अद्याप विद्यार्थींच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वरीष्ठ पातळीवरून दखल घेतली नाही. तसेच भास्कर मोरेला अटक करावी या मागणीसाठी जामखेड येथील ग्रामस्थांच्या वतीने जामखेड शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले हे देखील उपोषणास पाठिंबा दिला आहे. भास्कर मोरेच्या काळ्या करामतीचा निषेध करण्यासाठी व विद्यार्थीनींना न्याय देण्यासाठी पालक म्हणुन जबाबदारी पार पाडावी आसे अवहान केले आहे. तरी जामखेड शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी या बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here