शहरातील तपनेश्वर जि. प. शाळेला संरक्षक भिंत व्हावी, वंचित बहुजन आघाडीने केले भिक मांगो आंदोलन
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील तपनेश्वर शाळेत गोरगरिब, बहुजन व ऊसतोड मजूरांची मुले शिक्षण घेत असून शाळेला संरक्षक भिंत नसल्याने त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिक्षण हा आमचा संविधानीक अधिकार आहे. या पार्श्वभूमीवर या अधिकाराचे पालन व्हावे यासाठी मुलांना सर्व सुविधा मिळणे गरजेचे आहे. यासाठी पंचायत समिती व नगर परिषद प्रशासनाने संयुक्तिक बैठक घेऊन यावर तोडगा काढावा व लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आम्हाला वरिष्ठ कार्यालयापुढे अंदोलन करावे लागेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक ॲड.डाॅ.अरुण जाधव यांनी दिला आहे.
जामखेड शहरातील तपनेश्वर शाळेला संरक्षक भिंत नसल्याने त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर काल दि. ११ मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक ॲड. डाॅ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली व उपस्थितीत जामखेड पंचायत समिती समोर भिक मांगो आंदोलन करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडी भटके मुक्त राज्य समन्वयक ॲड. डॉ अरुण (आबा) जाधव, लोक अधिकार आंदोलन प्रवक्ते बापूसाहेब ओव्हळ, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अतिश पारवे, विशाल पवार, भिमराव सुरवसे, शहानूर काळे, मोहन शिंदे, मोहन चव्हाण, उत्तम सावंत, राजाराम साळवे, वंचित बहुजन युवा जिल्हा महासचिव सोमनाथ भैलुमे, विकास समुद्र, सचिन भिंगारदिवे, वैजिनाथ केसकर, राजु शिंदे, संतोष चव्हाण, गायकवाड ऋषीकेश, दिपाली काळे , रेश्मा बागवान, द्वारका पवार, सुरज तायडे, प्रेरणा खडके, रामेश्वर काळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी धनवे म्हणले की, जामखेड शहरातील प्राथमिक शाळा नगरपरिषद हद्दीत असल्या तरी त्यांचे हस्तांतरण झालेले नाही. त्यांचे कामकाज अजुनही पंचायत समिती शिक्षण विभागांतर्गत चालत आहे. त्यामुळे तपनेश्वर शाळेला संरक्षक भिंत होणे गरजेचेच आहे. या भिंतसाठी जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियान अंतर्गत काही करता येईल का, यासाठी वरिष्ठांशी चर्चा करून हे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल असे अश्वासन देतो.
यावेळी गटविकास अधिकारी यांनी सांगितले की, जामखेड शहरातील तपनेश्वर ही शाळा नगरपरिषद हद्दीत असल्याने पंचायत समितीच्या माध्यमातून या शाळेसाठी संरक्षक भिंत बनविण्यात अडचणी येत आहेत. त्याबाबत जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांच्याशी बोलाने झाले मात्र त्यांनी यावर्षीचे बजेट संपले. हे काम पुढील बजेट मध्ये एप्रिल किंवा मे महिन्यात करता येऊ शकेल. त्याशिवाय जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन घेऊन काही करता येत असेल तर हा प्रश्न पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मार्गी लावला जाईल असेही आश्वासन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी यावेळी दिले.

यावेळी ॲड. डॉ. अरूण (आबा) जाधव यांनी या शाळेला कंपाऊंड होणे किती आवश्यक आहे. हे मोठ्या तळमळीने सांगितले. तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी पंचायत समिती कार्यालय दणाणून गेले होते. तसेच यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष विकास मासाळ व आम आदमी पार्टीचे संतोष नवलाखा यांनीही याठिकाणी उपस्थित राहुन या अंदोलनास पाठींबा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here