आजी माजी सौनिकांसह सर्व सभासद दिपक महाराज गायकवाड यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे रहातील – कॉप्टन लक्ष्मण भोरे
जामखेड येथे पारनेर बँक निवडणुकीच्या परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ संपन्न
जामखेड प्रतिनिधी
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या निवडणुकीत उभे राहिलेले उमेदवार दिपक महाराज गायकवाड यांचा धार्मिक व सामाजिक क्षेत्रात सक्रीय सहभाग असतो. पुढील पाच वर्षांत तालुक्यातील आजी माजी सैनिकांना मान देऊन सर्वच सैनिकांना बँकेचे सभासद करुन घेण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे आजी माजी सौनिकांसह सर्व सभासद दिपक महाराज गायकवाड यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे रहातील असे मत शिवनेरी अकॅडमी चे संचालक कॉप्टन लक्ष्मण भोरे यांनी व्यक्त केले.

पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक लि. पारनेर संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मा. पद्मभूषण जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या प्रेरणेने परीवर्तन पॅनलचे जामखेड येथील अधिकृत उमेदवार दिपक जिजाबा गायकवाड सर्वसाधारण प्रतिनिधी यांच्या प्रचाराचा नारळ मंगळवार दि ६ रोजी ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिर येथे वाढवून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी सोमनाथ पोकळे, नगरसेवक अमित चिंतामणी, बिभीषण (मामा) धनवडे, प्रा. सुनिल नरके, कॉप्टन लक्ष्मण भोरे, अर्जुन म्हत्रे, गणेश राळेभात, दादा डोके, कांतीलाल कवादे, शहाजी ढेपे, सतिश ढवळे, नानासाहेब कार्ले, राजकुमार भराटे, रावसाहेब कापसे, कचरू घोडके, संतोष जगदाळे, सुग्रीव आडाळे, दत्तात्रय डिसले, पोपट सांगळे, जगन्नाथ धर्माधिकारी, महादेव कार्ले, अशोक चव्हाण, बप्पा भोरे, कुंडलीक आडाळे, प्रमोद कार्ले, रमेश मोरे, तुकाराम ढोले, लक्ष्मण डोके, दादा डोके, दत्ता चऱ्हाटे, किसन चिलगर, कुंडल राळेभात, घोडके साहेब यांच्या सह आजी माजी सैनिक व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना शिवनेरी अकॅडमी चे संचालक कॉप्टन लक्ष्मण भोरे म्हणाले की दिपक महाराज हे येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत उभे राहिले आहेत. त्यांचे आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात खुप मोठे काम आहे. त्यांच्या कडे नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व, दातृत्व आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यातील सर्वच आजी माजी सौनिकांना पारनेर बॅंकेचे सभासद करण्याचा संकल्प दिपक महाराज गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे सर्व सैनिक त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे रहातील व तळमळीने मदत करतील असे मत कॅप्टन लक्ष्मण भोरे व्यक्त केले.
यावेळी बोलताना उमेदवार दिपक महाराज गायकवाड म्हणाले की, जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी स्थापन केलेल्या बँकेचा विकास व्हावा म्हणून निवडणूक लढवत आहे. तसेच आगामी काळात तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिकांना सभासद करणारच असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी महादेव नेमाने, किसन चिलगर साहेब, डॉ. सुनील नरके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना
दिपक गायकवाड यांच्या पाठिशी उभे राहावे त्यांना सेवा करण्याची संधी द्यावी. विमान चिन्हावर शिक्का मारावा आजी माजी सैनिकांचा विचार करणारे उमेदवार आहेत. त्याना सामाजिक व राजकीय सहकार्य आहे. दिपक महाराज गायकवाड हे सर्व समावेशक उमेदवार आहेत असे सांगितले व शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here