मुलांनमधिल कैशल्य व गुण विकसित करण्याचे काम लोकमान्य क्रीडा महोत्सवामुळे होतय – प्रा. मधुकर राळेभात
जामखेड प्रतिनिधी
लहान मुलांचे कॅलिबर शोधण्याचे काम या महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. या शाळेतील मुलांमध्ये जी वेगवेगळी कौशल्य व गुण आहेत हे शोधून ते चांगल्या पद्धतीने विकसित करायचे यासाठी हा “लोकमान्य क्रीडा महोत्सव २०२४ ” एक उदाहरण ठरेल आसे मत प्रा. मधुकर राळेभात यांनी व्यक्त केले.
जामखेड शहरातील नामांकित असलेल्या लोकमान्य तरूण, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संचलित नवीन मराठी प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “लोकमान्य क्रीडा महोत्सव २०२४” चे उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले.
समारंभ पुर्वक झालेल्या या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती दिलीप गुगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शिवनेरी अकॅडमीचे संचालक सेवा निवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे, ल. ना. होशिंग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, संस्थेचे संचालक लक्ष्मीकांत देशमुख, वसंत राळेभात, जामखेड विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक डॉ. आण्णासाहेब मोहिते शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मीना राळेभात, पालक दत्तात्रय चऱ्हाटे, आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा मधुकर राळेभात म्हणाले की या शाळेचे कर्मचारी व संस्थेचे पदाधिकारी यांनी जो हा महोत्सव घडवून आणला त्या माध्यमातून या शाळेतील मुलांना खेळण्याची संधी मिळाली, त्या संधीचे सोने करत जे खेळाडू निर्माण होतील ते तालुका, जिल्हा, राज्य व देशपातळीवर मोठे यश संपादन करतील. हा महोत्सव जामखेड व परिसरातील खेळाडूंना एक सुवर्णसंधी असाच ठरेल. शाळेतील खेळाडू व यासाठी काम करणाऱ्या सर्वांसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. हा महोत्सव असाच कायमस्वरूपी होत रहावा. अशाही अपेक्षा यावेळी प्रा. मधुकर राळेभात यांनी व्यक्त केल्या.
यावेळी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले करताना दिलीप गुगळे म्हणाले की, मैदानी खेळ खेळणे शरीर व मन यासाठी खूप आवश्यक आहे. शाळेने आयोजित केलेल्या “लोकमान्य क्रीडा महोत्सव २०२४” यातून देशासाठी मोठे खेलाडू निर्माण होतील. शाळेकडे तितक्या सुविधा उपलब्ध नसतानाही शाळेची मोठी प्रगती झाली आहे. यात शाळेच्या कर्मचारी वर्गाचे मोठे योगदान आहे. त्यासाठी त्यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मीना राळेभात म्हणाल्या की, आज पालक हे विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासाकडे जास्त लक्ष देत आहेत. विद्यार्थी शाळेच्या व क्लासच्या माध्यमातून पुस्तकी ज्ञान घेत आहेत. त्यामुळे त्यांचा शारीरिक विकास मागे राहत आहे व आरोग्याकडेही दुर्लक्ष होत आहे. मुलं मोबाईल व टीव्हीपासून दूर राहावेत त्यासाठी ती ग्राउंडवर असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचा जर सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर तो शारीरिकदृष्ट्या सक्षम पाहिजे. यासाठी शाळेत ने हा महोत्सव आयोजित केला आहे. या स्पर्धेसाठी मागील जुलै महिन्यापासून रोज खो-खो, कबड्डी, लंगडी व रिले यासारख्या खेळांचा मुलांकडून स्पर्धात्मक सराव करून घेतला जात आहे. जेव्हापासून हा सराव घेतला जात आहे. तेव्हापासून मुलांचा आहार वाढला आहे. मुलं मोबाईल व टीव्हीपासून दूर झाले आहेत. त्यांची प्रतिकारशक्ती वाढलेली आहे व आजारी पडण्याचे प्रमाणही कमी झालेले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने “लोकमान्य क्रीडा महोत्सव” याचा उद्देश सफल झाल्यासारखे वाटते. आम्ही हा महोत्सव वर्षानुवर्ष सुरू ठेवणार आहोत. यासाठी आम्हाला संस्था पदाधिकारी यांचे चांगले मार्गदर्शन व शिक्षकांची खंबीर अशी साथ मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भविष्यात या शाळेतील मुले देशपातळीवर चमकतील यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या “लोकमान्य क्रीडा महोत्सव २०२४” चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून व खो-खो चा सामना लाऊन करण्यात आली. नवीन मराठी शाळेने आयोजित केलेल्या पहिल्याच क्रीडा महोत्सवाचे आयोजन अगदीच वैशिष्टय़पूर्ण ठरले. यावेळी सादर केलेल्या ऑलिम्पिक गित व खेळाडूंच्या मार्चमुळे वातावरण ऑलिम्पिकमय झाले होते. तसेच उद्योजक दिलीप गुगळे यांनी खेळाडूंसाठी १०६ टी शर्ट भेट दिले. त्या टी शर्टनेही स्पर्धेच्या वातावरणात वेगळीच रंगत आणली होती. मोठ्या उत्साहात सुरू झालेल्या या क्रिडा स्पर्धाच्या उद्घाटन समारंभाचे संतोष बांगर तर आभार मुख्याध्यापिका श्रीमती मीना राळेभात यांनी मानले. तर क्रीडा स्पर्धांसाठी घुले सर व नागरगोजे सर प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. या क्रिडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या दि. ३ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती शाळेच्या वतीने देण्यात आली आहे.