रोखठोक आष्टी ….
कर्हेवडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच पद आरक्षित असल्याने या ग्रामपंचायतीवर सौ वंदना परिवंत परिवंत गायकवाड यांची निवड तर उपसरपंचपदी २१ वर्षीय तरुण सुग्रीव बाळासाहेब नागरगोजे यांची बिनविरोध निवड अध्यक्षीय अधिकारी खान यांनी जाहीर केली.
आष्टी तालुक्यातील १२ ग्रामपंचायतचे दि.१५ जानेवारी रोजी मतदान होऊन १८ रोजी निकाल जाहीर झालेल्या निवडणूक प्रक्रियेत क-हेवडगांवच्या सार्वत्रिक निवडणुकीत गावकरी विकास पॅनल व महाग्राम विकास पॅनल मध्ये दुरंगी लढत होऊन गावकरी विकास पॅनलने सातही जागेवर वर्चस्व मिळवत एकहाती सत्ता मिळवली. सरपंच उपसरपंच निवडीसाठी लक्ष लागलेल्या गावकर्यांना अखेर आज दि.१७ रोजी सरपंच उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये सरपंच पद आरक्षित असल्याने सौ वंदना परिवंत परिवंत गायकवाड तर उपसरपंच २१ वर्षीय तरुण सुग्रीव बाळासाहेब नागरगोजे यांची बिनविरोध निवड अध्याक्षिय अधिकारी खान यांनी जाहीर केली. सरपंच व उपसरपंच बिनविरोध झाल्याने कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला
तालुक्यातील कर्हेवडगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आ. सुरेश धस, मा. आ. भिमराव धोंडे, गावचे मा.सरपंच नवनाथ नागरगोजे, मा.सरपंच केशव बांगर, मा. सरपंच सुभाष नागरगोजे, मा. उपसरपंच श्रीधर खांडवे, गंगाधर गायकवाड, भगवान सांगळे, योगीनाथ बांगर, सोमिनाथ विधाते, सुनिल शिंदे, अभिमन्यू शिंदे, संजय गायकवाड, राम नागरगोजे, आप्पासाहेब नागरगोजे, हनुमंत गायकवाड, आजिनाथ सांगळे, बाळु खांडवे, बळीराम खांडवे, गणेश टकले, शरद खांडवे, महेश गायकवाड, युवा नेते जयदीप गायकवाड, अक्षय ( बंटी) गायकवाड, शहादेव गायकवाड, अरुण गायकवाड, सोमा गायकवाड, किरण गायकवाड, बाळू गायकवाड, सुरेंद्र गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, मोहन गायकवाड, अॅड. सतिशकुमार गायकवाड यांच्या अथक परिश्रमाने गावकरी विकास पॅनलचे सौ. गितांजली अशोक विधाते, शुभम खांडवे, जालिंदर खांडवे, वंदना गायकवाड, मनिषा बांगर, सुग्रीव नागरगोजे , वर्षा नागरगोजे हे सर्वच उमेदवार विजयी झाल्याने एकहाती सत्ता मिळवली. सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला आरक्षित झाले होते. सरपंच पदासाठी वंदना गायकवाड यांचा एकमेव अर्ज आला तर उपसरपंच पदी २२ वर्षाचे तरुण सुग्रीव नागरगोजे यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवडणूक झाली. ही निवडणूक प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सकाळी १० वाजेपासून सुरू झाली सरपंच उपसरपंच पदासाठी १२ वाजेपर्यंत प्रत्येक एक एक अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड झाली ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा फडकावला आहे. बिनविरोध निवडणुकीबद्दल आ. सुरेश धस, मा.भीमराव धोंडे, विजय गोल्हार तालुक्यातील सामाजिक, राजकिय, वर्तुळातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ही निवडणूक प्रक्रियेत अध्यासी अधिकारी आय. ए. खान व सहाय्यक ग्रामसेवक बी.बी.गाढवे यांनी काम पाहिले त्यांना मदत ग्रामपंचायत शिपाई रहिम ( सलवार ) शेख यांनी केली.
———————————————————————
गावच्या विकासासाठी राजकीय मतभेद गट तट भांडण बाजूला ठेवून गावात शांतता आणि समृद्धी नांदण्यासाठी सर्वांना एकत्रित करून गावचा विकास करु. गोर गरिब सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देऊ,शासकीय योजनांच्या लाभा पासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही,महिलांना रोजगार, गावातील विकास कामे करण्यासाठी कटिबद्ध राहील. सरपंच पदी निवड झालेली ही माझी व्यक्तीगत लढाई नसुन समाजातील शेवटच्या घटकांची आहे.सत्याचा विजय आहे.
वंदना परिवंत गायकवाड ( नवनिर्वाचित सरपंच )
———————————————————————कर्हेवडगाव ग्रामस्थांनी विश्वास ठेवून आम्हाला भरघोस मतांनी विजयी करून दिल आहे.व सर्व सदस्यांनी मला उपसरपंच पदी बिनविरोध निवडून दिल्या बद्दल सर्वांचे मनापासून आभार जो माझ्यावर विश्वास दाखवला तो मी सार्थ करून दाखवेल येणाऱ्या काळात गावचा विकास करून गावाचा कायापालट करून दाखवल्याशिवाय राहणार नाही –
सुग्रीव नागरगोजे, ( नवनिवार्चित उपसरपंच,क-हेवडगांव)






