कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेला मनोज जरांगेंना बोलवा
जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने केली मागणी
जामखेड प्रतिनिधी
कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिरातील महापुजा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते करावी आशी मागणी जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चा, वारकरी व शेतकर्‍यांच्या वतीने मंदिर समीती व सरकारकडे करण्यात आली आहे.
राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पंढरपुरातील कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेला बोलावण्यास विरोध झाल्यानंतर ही पूजा कुणाच्या हस्ते करावी असा पेच निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी विरोध करणाऱ्या मराठा समाजातील आंदोलकांनी आता या महापूजेसाठी मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील याना निमंत्रित करावे अशी मागणी केली आहे. जामखेड येथिल सकल मराठा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जामखेड तहसील कार्यालयासमोर गेल्या सोळा दिवसांपासून जामखेड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे काल तालुक्यातील धोंडपारगाव येथील ग्रामस्थांनी या साखळी उपोषणात सहभाग घेतला आहे. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे.
आषाढीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा नियम आहे. मात्र मराठा आरक्षण न मिळाल्याने पंढरपूर येथील सकल मराठा समाजाने यंदा कार्तिकी महापूजेसाठी कोणत्याही उपमुख्यमंत्री, मंत्री अथवा आमदाराला येऊ दिले जाणार नसल्याची घोषणा केली आहे. मंदिर समितीनेही मराठा समाजाच्या प्रक्षोभ शासनाला कळविला असून कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांनी निमंत्रण देणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता यंदा कार्तिकी एकादशीची महापूजा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्याची मागणी जामखेड तालुक्यातील मराठा समाजाने केली आहे.
मनोज जरांगे यांनी 15 नोव्हेंबर पासून आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली असून त्यांचा हा दौरा 23 नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे. कार्तिकी एकादशी देखील 23 नोव्हेंबर रोजी असून मराठा समाजाच्या वतीने केल्या गेलेल्या या मागणीबद्दल आता जरांगे काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल.
कार्तिकी सोहळ्यासाठी येणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी रोखण्याचा निर्णय पंढरपूर येथील मराठा आंदोलकांनी घेतल्याबाबत देखील मनोज जरांगे यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. आता थेट त्यांच्याच हस्ते कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करण्याची मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे. मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी आरक्षण वेळेवर द्यावेच, शिवाय समाजासाठी प्रामाणिकपणे लढणाऱ्या मनोज जरांगे याना महापूजेसाठी निमंत्रित करावे अशी मागणी आशी मागणी जामखेड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here