चार महीन्यांपासून वीज गायप, महीलांनी ठोकले महावितरण कार्यालयास टाळे
जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील साकत परीसरात कोल्हेवाडी या ठीकाणी गेल्या चार महिन्यांपासून विज पुरवठा बंद होता. तुटलेल्या लाईट च्या जोडुन देण्यासाठी आनेक वेळा पत्रव्यवहार करुनही महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला. परीणामी गेल्या चार महिन्यांपासून वीजेच्या अभावी महीलांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. आखेर संतप्त महिलांनी जामखेड येथिल महावितरण च्या कार्यालया समोर ठीय्या आंदोलन करत कार्यालयास टाळे ठोकले.
तालुक्यातील कोल्हेवाडी परीसरात चार महिन्यांपासून लाईट च्या तारा तुटल्याने पाणीपुरवठा बंद आहे. आनेक वेळा लेखी व तोंडी कळवुन देखील महावितरण कंपनीचे कार्यकारी हलगर्जीपणा करत होते. परीणामी जणावरांना व ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत होता. महीलांनी देखील कोसो दुर वरुन पाणी घेऊन यावे लागत होते.
यामुळे सतंप्त महिलांनी महावितरणच्या कार्यालयाला घेराव घालत ठीय्या आंदोलन केले. तसेच कार्यालयाला टाळे ठोकले जोपर्यंत लाईट सुरू होत नाही तोपर्यंत टाळे उघडणार नाही असे महिलांनी सांगितले आम्हाला सणा सुदीच्या काळात महिलांना दिवसभर लाईट साठी घरदार सोडून जामखेड मध्ये बसावे लागले. महिलांचा रूद्र अवतार पाहून महावितरण खडबडून जागे झाले व ठेकेदारांला ताबडतोब कोल्हेवाडी येथील लाईट जोडण्यासाठी सांगितले.

यावेळी महिला समवेत सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे, बिभीषण धनवडे, सरपंच हनुमंत पाटील, उपसरपंच राजाभाऊ वराट, सागर कोल्हे, संतोष कोल्हे, अशोक कोल्हे, विनोद कोल्हे, गोजर नेमाने कृषी सखी पंचायत समिती, मनिषा कोल्हे, अलका कोल्हे, द्वारकाबाई कोल्हे, अनिता कोल्हे, उषा पवार, मैना कोल्हे, जयश्री सरोदे, मंगल कोल्हे, अंजली कोल्हे, गौरी कोल्हे, राणी कोल्हे, सिंधुताई कोल्हे, रतन शेख, सोनाली कोल्हे, शांताबाई कोल्हे, बायडाबाई कोल्हे, शालन कोल्हे, कांताबाई कोल्हे यांच्या सह अनेक महिला उपस्थित होत्या.
यावेळी लेहनेवाडी येथील मगर वस्ती वरील सिंगल फेज डिपी बंद आहे. बीले भरूनही सणासुदीला अंधारात राहावे लागत आहे. यामुळे अनेक सतंप्त तरूण आले होते. पांडुरंग मगर, रामहरी बाबर, सोमनाथ कांबळे यांच्या सह अनेक तरुण आले होते.
चौकट.
घरोघरी दिपावली सणाची लगबग असताना कोल्हेवाडी येथील महिलांना जामखेड मध्ये दिवसभर लाईट साठी बसावे लागले. चार महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने वयोवृद्ध नागरिकांना दुरवरुन पाणी शेंदून आणावे लागत आहे. घरातील तरूण ऊसतोडणी साठी गेल्याने वृद्ध मानसांचे हाल होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here