जामखेड तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करावा, राष्ट्रवादी काँग्रेसची निवेदनाद्वारे मागणी.
जामखेड तालुक्यात सरासरीपेक्षाही खूपच कमी पाऊस झाल्याने खरीपाची पिके तर गेलीच आहेत. चर रब्बीची पिकेही वायला जातील अशी परिस्थिती निर्माण झाली आहेत. तालुक्यातील नदी, नाले, बंधाऱ्यांमध्ये पाणीच आले नाही. या पार्श्वभूमीवर शासनाने जामखेड तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
या बाबत तहसिलदार योगेश चंद्रे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २०२३ या वर्षा चालू वर्षात जामखेड तालुक्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीपाची पीके वाया गेली आहेत. प्रामुख्याने रब्बी उत्पादक तालुका म्हणुन जामखेडची नोंद आहे. रब्बी पिकासाठी परतीच्या पावसाची आवश्यकता खुप असते परंतु परतीचा पाऊसही झाला नाही. त्यामुळे खरीपा बरोबर रब्बीचे पीकही वाया जाण्याची वेळ तालुक्यावर आली आहे. पावसाअभावी ज्वारीचे पिक ही पाहिजे तसी उगवले नाही. त्यामुळे केलेली दुबार पेरणी वाया गेली आहे.
पाऊस कमी झाल्यामुळे विहिरी बारवांना नदी नाल्याला पाणी नाही. नाले, बंदारे, तळे, पाझरतलाव यामध्ये पाणी न साठल्यामुळे ऊस व फळबागाचे नुकसान निश्चित आहे. याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण होणार आहे. माणसांचा ही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. याचा विचार करून जामखेड तालुका दुष्काळ सदृश्य तालुका म्हणून जाहीर व्हावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

यावेळी जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, दत्तात्रय वारे, प्रा. राजेंद्र पवार शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, प्रशांत राळेभात, अमित जाधव, कुंडल राळेभात, हरिभाऊ आजबे, अवधुत पवार, विजय काशिद, प्रा. राहुल आहिरे, गणेश घायतडक, डॉ. कैलास हजारे, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, जयसिंग डोके, सचिन डोके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here