दप्तर मुक्त शाळा उपक्रम अंतर्गत तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दांडिया नृत्याचे आयोजन

जामखेड प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी व भविष्यात विद्यार्थ्यांना पाठदुखीचा त्रास होऊ नये. तसेच अभ्यासाच्या तणावातून थोडे मुक्त होण्यासाठी शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तपनेश्वर येथे दप्तर मुक्त शाळा उपक्रम अंतर्गत दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी अत्यंत आकर्षक वेशभूषा मध्ये आणि टिपरीसह शाळेमध्ये उपस्थित होते. जामखेड तालुक्याचे तालुका गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब धनवे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज शनिवार दि 21 10 2023 रोजी दप्तर मुक्त शाळा उपक्रम अंतर्गत अंतर्गत दांडिया नृत्याचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तपनेश्वर येथे आयोजित करण्यात आले.

सर्व शिक्षकांतर्फे या आनंददायी उपक्रमा निमित्त चविष्ट भेळेचा आस्वाद कार्यक्रम सरते शेवटी देण्यात आला. जामखेड केंद्राचे केंद्रप्रमुख तथा शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेश मोहिते सर, सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री महेंद्र आदे, उपाध्यक्ष श्री धनराज पवार यांनीही दांडिया नृत्याचा आनंद विद्यार्थ्यांसह घेतला.

शिकण्यासाठी ताण व चांगले वातावरण मिळायला हवे. यासाठी दप्तर मुक्त दिन आठवड्यातून एक दिवस शनिवारी साजरा करण्याचे ठरविण्यात आले. जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे एक दिवस का होईना कमी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here