खर्ड्यात अवैध गुटखा विक्री दोन दुकानावर स्थानिक गुन्हा शाखेची कार्यवाही, दोन आरोपी ताब्यात,दोन फरार..
जामखेड प्रतिनिधी
अहमदनगर येथील स्थानिक गुन्हा शाखेने खर्डा येथील दोन दुकानात अवैध गुटखा व पान मसाला विक्री करताना धाड टाकून चार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. अतुल एजन्सीचे अनिल पांडुरंग लोंढे तर बरकत गोळी सेंटरचे मालक सद्दाम शिराज तांबोळी यांना ताब्यात घेतले आहे. तर अशोक बबन तोंडे रा. सतेवाडी, तालुका जामखेड व रेवननाथ शिंदे रा. चौसाळा जिल्हा बीड हे दोन आरोपी फरार झाले आहेत.
खर्डा शहरात महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला व शरीरास अपायकारक होईल असा खाद्यपदार्थ व विविध कंपनीचा पान मसाला गुटखा याची साठवणूक करून दोन दुकानदार विक्री करताना आढळून आले आल्याने त्यांच्यावर अहमदनगर गुन्हा शाखेने कारवाई केल्याने खर्ड्यात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल रणजीत पोपटराव जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, अनिल लोंढे यांच्या अतुल एजन्सी नावाच्या दुकानात दुपारी एक वाजून 30 मि.वाजता विमल पान मसाला चे 21 पुढे किंमत 3768 रुपये, व्ही 1 तंबाखू जांभळे, पिवळा रंगाची 26 पुढे किंमत 780 रुपये, राज निवास पान मसाला कंपनीचे आठ पुढे 1536 रुपये, प्रीमियम जेड एल 1 जाफरानी जर्दा तंबाखू एकूण दहा पुढे 480 रुपये, हिरा पान मसाला कंपनीचे 18 पुडे एक विशेष साठ रुपये रॉयल 717 तंबाखूचे 75 पुढे 2250 रुपये असा एकूण दहा हजार 974 रुपयांचा हस्तगत करून गु.र.नं.177/2023 भा.द. वि.कलम १८८,272,273, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
तसेच येथील बरकत गोळी सेंटरचे मालक सद्दाम शिराज तांबोळी यांच्या दुकानात विमल पान मसाला चार पुढे 792 रुपये,व्ही 1 जाफरांनी जरा तंबाखू 16 पुढे 768 रुपये, हिरा पान मसाला कंपनीचे 17 पुढे 2040 रुपये, रॉयल 717 तंबाखूचे वीस पुढे सहाशे रुपये, गोवा कंपनीचा गुटखा 54 पुढे 10 हजार 80 रुपये, आरएमडी कंपनीचा एकूण सहा पुढे 2160 रुपये, असा एकूण 21 हजार 472 रुपये किमतीचा माल जप्त करून गुन्हा शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल रोहित मधुकर मिसाळ यांच्या फिर्यादीवरून गु.र.नंबर व कलम 178/2023 भा. द.वी. कलम 328,188,272,273,34 प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल केला आहे. 
अशा प्रकारे दोन दुकानातून मानवी शरीरास अपायकारक व राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा साठा करून त्याची विक्री करताना आढळला आहे, खर्डा येथे गुटखा विक्रीचे कारवाई झाल्याने पान टपरी धारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. याबाबतचा अहवाल पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर, अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय कार्यालय कर्जत यांना सादर केला असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक आर.डी.जायभाय पोलीस कॉन्स्टेबल आर.डी.नागरगोजे पोलीस कॉन्स्टेबल शेषराव मस्के हे पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here