जामखेड शहरात श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
जामखेड प्रतिनिधी
श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहात्सवा निमित्ताने सालाबाद प्रमाणे यावर्षी जामखेड येथिल श्री कृष्ण नगर (मोरे वस्ती) या ठीकाणी आसलेल्या श्री कृष्ण मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमीत्ताने मंदिरात संगीत भागवत कथा, कीर्तीन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनंदिन होणाऱ्या कार्यक्रमामध्ये गुरुवार दि.३१ ऑगस्ट २०२३ ते बुधवार दि.०६ सप्टेंबर २०२३ रोजी दररोज सायंकाळी ६ ते ९ भागवत कथाकार ह. भ. प. दयाल चैतन्य प्रभु यांची संगीत भागवत कथा होणार आहे. तसेच बुधवार दि.०६ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ४ ते ६ महिला मंडळ भजन, रात्री ९.०० ते १२.०० श्रीकृष्ण कथा अभिषेक व श्रीकृष्ण जन्म अभिषेक रात्री १२ ते १२:३० वाजता श्रीकृष्ण जन्म व पाळणागीत होईल.
गुरुवार दि ७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत ह.भ.प. दयाल चैतन्य प्रभु यांचे काल्याचे किर्तन होईल. तर याच दिवशी दुपारी १२ वाजता दही हंडी कार्यक्रम होऊन दुपारी १२.०५ ते ३ वा. पर्यंत महाप्रसाद होईल वाटप करण्यात येणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहुन लाभ घेण्याचे आवाहन श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.