अरणगाव येथे शेतकऱ्यांसाठी कृषीदुतांकडून बोर्डो मिश्रण तयार करण्याचे प्रात्यक्षिक
जामखेड प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय हाळगावच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषि जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम व वनस्पती रोग शास्त्र विभाग अंतर्गत अरणगाव ( पारेवाडी शिवार ) येथे बोर्डो मिश्रण तयार करण्याच्या प्रक्रियेचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखविले .

बोर्डो मिश्रण—तांबे सल्फेट, चुना आणि पाणी यांचे मिश्रण—हे एक प्रभावी बुरशीनाशक आणि जीवाणूनाशक आहे ज्याचा उपयोग फळझाडे, द्राक्षांचा वेल आणि फळे यांच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक दशकांपासून केला जात आहे.

अरणगाव येथे प्रामुख्याने लिंबू , सिताफळ व आंबा ही फळपिके घेतली जातात त्यामुळे येथील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेवून कृषीदुत – यश अहिरे , साईकिरण अटपलवार , अमेय बागले , ऋत्विक बानकर , सुशांत बिराजदार , विवेक चांदेवार आणि किरण चव्हाण यांनी हे प्रात्यक्षिक सादर केले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करत उदंड प्रतिसाद दिला , त्याबद्दल कृषीदुतांनी त्यांचे आभार मानले .

सदरील कार्यक्रम आयोजित करण्यासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ . जी. के. ससाणे , कार्यक्रम समन्वयक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ . एस. ए. अनारसे ,केंद्र प्रभारी डॉ. डी. ए. सोनवणे , अधिष्ठाता प्रतिनिधी तथा विषयतज्ञ (वनस्पती रोगशास्त्र विभाग ) डॉ. एम. ए. गुड , कार्यक्रम अधिकारी डॉ . एन.डी. तांबोळी व आदींनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here