७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री नागेश्वर मंदिरातील शिवलिंगास तिरंगी फुलांची सजावट
जामखेड प्रतिनिधी
जामखेड चे ग्रामदैवत नागेश्वर मंदिरात मंदिरात ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी नागेश्वर मंदिरातील महादेवाच्या शिवलिंगास आकर्षक तिरंगी फुलांनी सजावट करण्यात आली होती. श्रावण महिन्या निमित्ताने देखील दररोज वेगवेगळ्या प्रकारची सजावट करण्यात येणार आहे.
जामखेड -खर्डा रस्त्यावर वैतरणा नदीतीरावर श्रीनागेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर जामखेड वासीयांचे ग्रामदैवत आसुन श्रावण महिन्यात या श्रीनागेश्वराची मोठी यात्रा भरते. या वर्षी च्या ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी मंदिराती महादेवाच्या शिवलिंगास जामखेड येथिल शिवभक्त प्रशांत काळे कीरण सोनवणे नंदु शिंदे गैरव घायाळ यांनी आकर्षक तिरंगी फुलांनी सजावट केली होती. तसेच श्रावण महिन्या निमित्ताने याठिकाणी दररोज पावणे सात वाजता महाआरती होणार आहे. तसेच पुढील तीस दिवस श्रावण महिन्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे मंदिर व शिवलिंगाची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे.
याच बरोबर ग्रामदैवत श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त आज बुधवारपासून दी.१६ ऑगस्टपासून श्री नागेश्वर मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला श्रीनागेश्वर पालखी सोहळा सोमवारी ( दि.२१ ऑगस्ट ) होणार आसुन दररोज सायंकाळी ७ ते ९ वा. कीर्तन व नंतर आलेल्या सर्व भक्तांना भोजन असा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आसुन याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.