७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मूकबधीर विद्यालयात सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण .
जामखेड प्रतिनिधी
श्री ब्रह्मनाथ सेवा प्रसार शिक्षण मंडळ सेलू संचलित जामखेड येथील निवासी मूकबधीर विद्यालयात सामाजिक कार्यकर्ते तथा जैन कॉन्फरसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी यांच्या हस्ते ७६ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन करण्यात आले.

यावेळी बोलताना संजय कोठारी म्हणाले, मी दहा वर्षापासून या शाळेत नियमित येत आहे. मुक बधीर विद्यालयातील मुलांना खूप चांगल्या प्रकारे येथील शिक्षक सांभाळत आहेत. त्यांचे राहणीमान, स्वच्छता पाहून समाधान वाटते. साधारण आठ ते दहा शिक्षक हे विनापगार असून, विनाअनुदान शाळेत काम करत आहेत. अनुदान मिळण्याकामी जरूर प्रयत्न करू असे कोठारी यांनी सांगितले.

यावेळी उद्योजक आनंद गुगळे म्हणाले मी या आधी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या समवेत शाळेत आलो आहे. कारण विना अनुदान तत्त्वावर शाळा चालवून, शिक्षक मोफत काम करतात. ही खूप मोठी बाब आहे. तुमची कसलीही अडचण असली तर मला फक्त फोन करा मी स्वतः मदत करेल असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक गर्जे सर म्हणाले सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे कार्य आम्ही गेली दहा वर्षापासून पाहत आहेत अपघातातील हजारों लोकांना वाचवण्याचे काम ते सातत्याने करत आहेत त्यांचा आदर्श घेऊन आम्ही सुद्धा असे कार्य चालू करत आहोत.
यावेळी उद्योगपती आनंद गुगळे, संकेत कोठारी ,अमोल तातेड , उद्योजक प्रवीण छाजेड,अमोल लोहकरे, संजय कटारिया, कैलास शर्मा गर्जे सर , दहिफळे सर, गणेश आडसूळ, संतोष अडसूळ, अबुकर कुरेशी, अशोक काळे,गुफरान कुरेशी. शिंदे मॅडम. मैद मॅडम आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here