रोखठोक जामखेड….
बदलती जीवन शैली आणि धकाधकीच्या जीवनातील ताण तणाव हेच मानवी समाजात विविध आजार वाढण्याचे प्रमुख कारणे आहेत. मात्र, मानवाचा कितीही दुर्धर आणि जुनाट आजार बरा करण्याचे सामर्थ्य नैसर्गिक वनस्पतीत आहे.
सामाजिक कार्यकर्ते व सावळेश्वर ग्रृप चे संचालक रमेश आजबे यांनी डॉ स्वागत तोडकर यांचे नुकतेच आरोग्य शिबीर व व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या अध्यक्षा सौ सुनंदाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभापती सौ राजश्री सूर्यकांत मोरे, सुर्यकांत मोरे, माजी सभापती प्रा संजय वराट, दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे संचालक राजेश मोरे, प्राचार्य दिपक होशिंग, राष्ट्रवादी चे युवा नेते शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, इन्नुसभाई सय्यद, संजय बेरड, दादासाहेब ढवळे, सागर कोल्हे, चंद्रकांत आजबे, व्यापारी विजय कोठारी, घनशाम अडाले, विठ्ठल शेळके, भगवान गायकवाड, लिंमकर टेलर्स सह सावळेश्वर ग्रृप चे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना निसर्गोपचार तज्ञ डॉ स्वागत तोडकर म्हणाले की निसर्गात मनुष्याला नवसंजीवनी देण्याचं सामर्थ्य आहे. मात्र, धकाधकीच्या जीवनातीत ताण-तणाव आणि मरणाच्या भीतीपायी मनुष्य औषधांच्या आहारी गेला आहे. सोबतच रासायनिक खाद्यान्नामुळे आजाराची संख्या झपाट्याने वाढत असली तरी चिंता करण्याचे काहीही एक कारण नाही. कोणताही दुर्धर आजार निसर्गोपचाराने बरा करता होतो, निसर्गामुळेच मनुष्याचे जीवन च्रक सुरू आहे. निसर्ग कुणाचंही वाईट करीत नाही, फक्त मनुष्याला निसर्गाप्रमाणे बदलता आलं पाहीजे.
पशू-पक्षी निसर्गावरच अवलंबून आहे. त्यामुळे ते निरोगी आहेत. याउलट मनुष्य विविध औषधांवर अवलंबून आहे. औषधांच्या अतिरेकांमुळेच विविध आजाराच्या संख्येत भर पडतेय. कोणत्याही वनस्पतीकडे लाकूड म्हणून नव्हे तर, संजीवनी म्हणून बघा. जेवणात हलक्या आहाराचा समावेश करा. शक्यतोवर नैसर्गिक आहारच घ्या.आहार,विहार आणि विचारांमुळे मानवाला अनेक दुर्धर आजार जडले आहेत. मनशुध्द आणि सकारात्मक असेल तर कोणताही आजार मनुष्याच्या शरीरावर आघात करू शकत नाही. याउलट मन अस्थीर आणि अशुध्द असेल तर कोणत्याही औषधांचा कोणताही परिणाम शरीरावर जाणवणार नाही.
नंतर एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती या संस्थेच्या अध्यक्ष सुनंदाताई पवार यांनी बोलताना आपल्या भाषणात सांगितले की जामखेड शहराच्या स्वच्छतेसाठी सर्व एकत्र येऊन काम केले पाहिजे. स्वच्छता मोहीमेसाठी जसे कर्जत पेटून उठले आहे त्याप्रमाणे जामखेड मध्ये सुद्धा स्वच्छतेविषयी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. कर्जत जामखेड शहर हे स्वच्छता अभियानात पहील्या पाच मध्ये महाराष्ट्र अणायचे आहे. शहरात संक्रातीच्या वाणापेक्षा जामखेड नगरपालिकेला झाडे दान करा कारण तालुक्यात एकुण २२ हजार झाडे लावायची आहेत.






