एमआयडीसीची अधिसूचना सरकार काढत नसल्याच्या निषेधार्थ जवळा गाव कडकडीत बंद.

जामखेड प्रतिनिधी

तरुणांना हक्काचा रोजगार मिळावा यासाठी मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्जत जामखेडच्या एमआयडीसीची अधिसूचना सध्याचे सरकार काढत नसल्याच्या निषेधार्थ आज शुक्रवार दि २८ रोजी जवळा येथील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आला. या वेळी जवळा बसस्थानक येथे निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.

कर्जत जामखेड तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी एमआयडीसी मंजुर करण्यासाठी सध्याचे सरकार चालढकल करीत आहे. त्यामुळे नुकतेच कर्जत, राशीन, मिरजगाव जामखेड, खर्डा या ठीकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मात्र तरी देखील उद्योजक मंत्री उदय सामंत यांनी सर्व पुर्तता करुन तीन महीन्यानंतर एमआयडीसी बाबत निर्णय घेण्याचे आधिवेशनात सांगितले त्यामुळे कर्जत जामखेड तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. याच अनुशंगाने ठीक ठीकाणी या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.

सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार रोहित पवार यांनी एमआयडीसीचे अधिसूचना निघण्यासाठी उपोषण केले होते. तर त्याची दखल घेऊन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मीटिंग घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचा आश्वासन दिले होते. पण सरकारने ते आश्वासन पाळलेले नसून त्याच्या निषेधार्थ आणि एमआयडीसीला पाठिंबा म्हणून जामखेड तालुक्यातील जवळा येथे आज समस्त ग्रामस्थ जवळा यांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला.

यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक पाटील, युवा नेते अशोक पठाडे, उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर, अविनाश पठाडे, उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर, महाळू पवार, दत्ता रोडे, राहुल मासुळे, दिलीप मासोळे, सोमनाथ शिंदे, श्रीराम लेकुरवाळे, बबलू पवार, संजय आव्हाड( बाबा) आव्हाड माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंच सदस्य प्रवीण लेकुरवाळे, किरण पाटील, इरफान पठाण , अक्षय वाळुंजकर, रिजवान शेख, संदीप काढणे, अक्षय काढणे, अमजद पठाण, शुभम हजारे, स्वप्निल हजारे, शशिकांत( अण्णा) राऊत, आजिनाथ( आबा) हजारे, देविदास रोडे, हे उपस्थित होते हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here