राज्यस्तरीय वुशु स्पर्धेत जामखेडच्या अदित्य जायभायला सुवर्णपदक व श्रेयस वराटला रौप्य पदक

जामखेड प्रतिनिधी

ऑल महाराष्ट्र वुशु असोसिएशनच्या वतीने नुकत्याच अमरावती येथे राज्यस्तरीय ज्युनिअर व सब ज्युनिअर वुशु अजिंक्यपद स्पर्धा संपन्न झाल्या. यात जामखेड येथील अदित्य जायभायला सुवर्णपदक व श्रेयस वराटला रौप्य पदक मिळाले आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षात होत आहे.

या स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्हा संघामध्ये जामखेडचे आठ खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये आयडियल स्पोर्ट अकॅडमी जामखेड चे खेळाडू ज्युनियर गटामध्ये अदित्य आजिनाथ जायभायला सुवर्ण पदक तर सब-ज्युनियर गटामध्ये श्रेयस सुदाम वराटला रौप्य पदक मिळातले. अदित्य जायभायची राष्ट्रीय ज्युनिअर वुशु अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे.

या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडू व अहमदनगर जिल्हा वुशु संघटनेचे सचिव प्रा. लक्ष्मण उदमले व उपाध्यक्ष श्याम पंडित यांचे मार्गदर्शन लाभले. दोन्ही खेळाडूंचे आमदार रोहित पवार, आमदार प्रा. राम शिंदे, राज्य संघटनेचे सचिव सोपान कटके सर, जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील माजी जि. प.सदस्य प्रा. मधुकर राळेभात, उमेश काका देशमुख, जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, डॉ. भगवान मुरूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, श्री साकेश्वर विद्यालयातील मुख्याध्यापक व सर्व स्टाफ यांनी हार्दिक अभिनंदन केले व राष्ट्रीय वुशु स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here