आरणगाव येथिल कु. श्रावणी शंकर गदादे राज्य गुणवत्ता यादीत पाचवी

जामखेड प्रतिनिधी

पुर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आष्टीच्या वसुंधरा विद्यालयातील व जामखेड तालुक्यातील आरणगाव येथिल कु. श्रावणी शंकर गदादे ही राज्य गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक मिळविला. तीच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

आरणगाव येथिल कु श्रावणी शंकर गदादे ही आष्टी तालुक्यातील वसुंधरा विद्यालयात शिक्षण घेत आहे. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत या वसुंधरा विद्यालयातील आनेक विद्यार्थ्यांनी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. या मध्ये जामखेड तालुक्यातील आरणगाव येथिल कु श्रावणी शंकर गदादे हीने राज्य गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक मिळविला आहे. यामुळे तीचे जामखेड तालुक्यातून सर्व स्तरातून कौतुक होत आहे. श्रावणी ही राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा सरचिटणीस चे शंकरशेठ गदादे यांची कन्या आहे.

याच बरोबर राज्य पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत येथील वसुंधरा प्राथमिक विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील इयत्ता पाचवीचे १४; तर आठवीच्या आठ विद्यार्थ्यांनी राज्यात क्रमांक पटकावले आहेत. विद्यालयातील इयत्ता पाचवीचे ७५ तर आठवीचे ६२ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here