जामखेड ते साकत एस. टी. बस सेवा सुरू करावी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जामखेड ते साकत एस. टी. बस सेवा सुरू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जामखेड तालुका यांच्या वतीने जामखेड एस टी डेपो चे अगारप्रमुख शिंदे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, साकत कडभनवाडी पिंपळवाडी कोल्हेवाडी – – सावरगांव- धोत्री या गावातील भरपूर विद्यार्थी हे जामखेड याठिकाणी शिक्षण घेत आहेत, त्यांना जामखेड याठिकाणी येण्या-जाण्यासाठी खाजगी वाहनाचा वापर करावा लागत आहे. खाजगी वाहनाचा प्रवास विद्यार्थ्यांना व विद्यार्थीनीना हा धोक्याचा ठरत आहे. तरी साकत, पिंपळवाडी, कोल्हेवाडी, सावरगांव, धोत्री याठिकाणी एस.टी. बस थांबा सुरू करा. जामखेड ते साकत एस.टी. सेवा विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत सुरू करावी जेणे करून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. बस सेवा सुरू न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देत आहोत. याची सर्वस्वी जबाबदारी जामखेड आगाराची राहील असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देता वेळी म. न. से तालुका अध्यक्ष प्रदिप टापरे, पै.हवा (दादा) सरनोबत (युवा नेते), सनी सदाफुले (ता. उपाध्यक्ष), बालाजी भोसले (शहराध्यक्ष), अनिल पाटील (शहर उपाध्यक्ष), आकाश साठे, बालु मराळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here