जामखेड येथे ज्ञानज्योत शिक्षण संस्थेच्या पीजी डीएमएलटी आणि एक्स रे टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमास मान्यता
जामखेड (प्रतिनिधी ) –
येथील ज्ञानज्योत शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानज्योत पॅरामेडिकल कॉलेजला पिजी डीएमएलटी आणि एक्स-रे रेडियोग्राफी टेक्निक्स हे दोन अभ्यासक्रम सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाच्या तंत्र शिक्षण मंडळाने मान्यता दिली आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष ओंकार दळवी यांनी दिली.
जामखेड येथे नव्याने सुरू होत असलेल्या ज्ञानज्योत शिक्षण संस्थेच्या ज्ञानज्योत पॅरामेडिकल कॉलेजला ऍडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी आणि advance डिप्लोमा इन एक्स-रे रेडियोग्राफी टेक्निक्स या दोन अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ नुसार प्रवेश देण्यास महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळाने मान्यता दिली आहे. संस्थेच्यावतीने लवकरच याची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ओंकार दळवी यांनी दिली.